आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FIR Filed Against For MIM Leader Akbaruddin Owaisi At Agripada Mumbai

ओवेसी यांच्यावर गुन्हा दाखल, विनापरवाना अग्रीपाड्यात रॅली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तेलंगण राज्यातील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद मुसलमिन (एमआयएम) पक्षाचे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर पोलिसांनी विनापरवानगी रॅली काढल्याबद्दल गुन्हा नोंद केला आहे.

ओवेसी यांचा एमआयएम पक्ष या वेळी राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये उतरत आहे. त्यासाठी ओवेसी गेले आठवडाभर मुंबईत तळ ठोकून आहेत. भिवंडी आणि नागपाडा जंक्शन येथे त्यांच्या मागच्या आठवड्यात सभा झाल्या आहेत. ओवेसी यांचा मुक्काम सध्या नागपाडा परिसरात आहे. शुक्रवारी आवेसी अरब मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी आले होते. मशिदीमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी रॅली काढली. त्यांच्यासमवेत ३०० पेक्षा अधिक कार्यकर्ते होते. त्यामुळे वाहतूक कोलमडली, असा पोलिसांचा आरोप आहे. त्यावरून अग्रीपाडा पोलिसांनी ओवेसी यांच्यावर मुंबई पोलिस अॅक्ट ३७ (१), (३) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. मात्र, ‘आम्ही रॅली काढली नाही, कार्यकर्ते ओवेसी यांना भेटायला आले होते. अरब मशिदीसमोर केवळ भेट घेतली’, असे "एमआयएम' चे म्हणणे आहे.
अकबरुद्दीन ओवेसी हे प्रक्षोभक भाषण करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना शहरात येण्यास यापूर्वी प्रतिबंध घातले होते.