आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FIR Register Against Ajit Pawar At Gagakhed Police Station

अजित पवारांविरोधात गुन्हा दाखल, ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- गंगाखेडमध्ये सापडलेले 4 लाख 85 हजार रुपये प्रकरण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्‍ट्रवादीचे नेते अज‍ित पवार यांच्या अंगाशी आले आहे. अजित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवारांवर आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

अजित पवार यांच्यासह जिंतूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आणि परभणी जिल्ह्याध्यक्ष विजय भांबळे आणि चालक कृष्णा हजारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांच्या भरारी पथकाला गंगाखेड-परळी चेकपोस्टवर एमएच 09 डीएक्स 5210 या स्कॉर्पिओ गाडीतून तीन बॅगा जप्त केल्या होत्या. त्यात 4 लाख 85 हजार रुपयांची रोकड सापडली होती. एका बॅगेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कपडे आणि व्हिजिटिंग कार्ड सापडले. त्यासोबतच त्यांचा स्विय सहाय्यक देशमुख यांचेही कपडे एका बॅगेत सापडले होते. विशेष म्हणजे जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी जिल्ह्याध्यक्ष विजय भांबळे यांच्या प्रचाराची ही स्कॉर्पिओ जात होती.