आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट - भाजपचा ‘गड’ भक्कम करण्याचे प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूर्व विदर्भ (नागपूर विभाग )
विदर्भाचा धानाचा (भात) पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर विभागात २००९ मध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये लढती रंगल्या. आताही या दोन पक्षांमध्येच लढाई रंगणार असली तरी काही ठिकाणी प्रबळ उमेदवार देऊन राष्ट्रवादी आणि शिवसेनाही स्पर्धेत आहे. प्रमुख पक्षांच्या स्पर्धेत नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार, प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाची परीक्षा आहे. त्यापैकी गडकरी-फडणवीस जोडीच्या प्रगतिपुस्तकात किती गुण पडतात, हे त्यातल्या त्यात महत्त्वाचे ठरणार आहे.
विदर्भाचा कल
नागपूर जिल्ह्यातील १२ मतदारसंघांमध्ये बहुतांश ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप असाच संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ७ तर काँग्रेसने ३ मतदारसंघ जिंकले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले होते. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील फडणवीस यांची दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात प्रतिष्ठा पणाला लागली आहे. फडणवीसांना अडचण नाही, असे सध्यातरी दिसते. पश्चिम नागपुरात काँग्रेसचे विकास ठाकरे व भाजपचे आमदार सुधाकर देशमुख असा तुल्यबळ सामना आहे. सावनेरमधील ठेकेदार उमेदवाराचा अर्ज नामंजूर झाल्याचा फटका भाजपला बसणार असून काँग्रेसचे सुनील केदार यांच्या गोटात आशेचे वातावरण आहे. काटोलमध्ये राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांना लढत सोपी आहे. पूर्व नागपुरात भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यातील थेट लढतीत खोपडे वरचढ ठरू शकतात. उत्तर नागपुरात माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांना भाजपचे डॉ. मिलिंद माने, बसपाचे किशोर गजभिये यांचे आव्हान आहे. दक्षिण नागपुरात काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, राष्ट्रवादीचे दीनानाथ पडोळे आणि भाजपचे सुधाकर कोहळे अशा तिरंगी लढतीत शिवसेना नेत्याच्या बंडखोरीमुळे भाजपला संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. मध्य नागपुरात भाजपचे विकास कुंभारे आणि माजी मंत्री अनिस अहमद यांच्यात थेट सामना आहे. उमरेडमध्ये भाजपचे सुधीर पारवे व काँग्रेसचे संजय मेश्राम अशा थेट लढतीत पारवे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता दिसत आहे. कामठीत माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना एेन वेळेवर उमेदवारी दिल्याने भाजपचे विद्यमान आमदार चंद्रशेखर बावनकुळे हेच वरचढ ठरण्याची चिन्हे आहेत. रामटेकमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार आशिष जयस्वाल यांना भाजपचे मल्लिकार्जुन रेड्डी यांनी आव्हान दिले असले तरी जयस्वाल यांचा प्रभाव निर्णायक ठरण्याची अधिक शक्यता आहे. हिंगणात राष्ट्रवादीचे रमेश बंग, भाजपचे समीर मेघे आणि शिवसेनेचे प्रकाश जाधव असा त्रिकोणी सामना रंगेल.

पुढील स्लाईडमध्ये वाचा, विदर्भातील इतर जिल्ह्यांबद्दल...