आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harshwardhan Patil Daughter Ankita In Vidhansabha Election

एका साखर कारखान्याची डायरेक्टर अंकिता पाटील करतेय वडिलांसाठी प्रचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. प्रचार समाप्त होण्यासाठी दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचाराचा जोर वाढला असून उमेदवारांची धावपळ उडाली आहे. दिग्गज नेत्यांसह त्यांच्या कुटूंबातील सदस्यही प्रचारकार्यात सहभागी झाल्याचे चित्र दिसत आहेत.

राज्याचे माजी सहकार मंत्री आणि कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे कुटूंबही प्रचार करताना द‍िसत आहे. हर्षवर्षन पाटील इंदापूर विधानसभा मतदानसंघात निवडणूक लढवत आहेत. आपल्या मतदार संघात प्रचार करताना हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत त्यांची पत्नी भाग्यश्री आणि मुलगी अंकिता ही दिसत आहे.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील हे 1995 पासून इंदापूर मतदारसंघातून निवडून येत आहे. मात्र, यंदा निवडणुकीचे जागावाटपाचे गणित बिघडल्यामुळे कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीमधील आघाडी संपुष्टात आली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
एरव्ही कधी सार्वजनिक कार्यक्रमात न दिसणारी अंकिता पहिल्यादाच वडिलांसाठी प्रचार करत आहे. अंकिता ही पुण्यात मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असून एका साखर कारखान्याची संचालिका आहे. अंकितासोबत हर्षवर्धन आणि त्यांची भाग्यश्री या देखील साखर कारखान्याचे संचालक आहेत.

फॅशनेबल आयटम्सची आवड....
अंकिता हिला फॅशनेबल आयटम्सची खूप आवड आहे. नेहमी ती ज्वेलरी डिझाइननिंग शोमध्ये सहभागी होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, अंकिता हर्षवर्धन पाटील यांची ‍निवडक छायाचित्रे...