आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heavy Rain In Ramtek Vidarbha Effect On Maharashtra Assembly Election

विदर्भात मुसळधार पाऊस, सावनेर मतदान केंद्रावर वीज कोसळून एकाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाल्याने मतदारांची धांदल चांगलीच उडाली आहे. रामटेकमधील सावनेर मतदान केंद्रावर वीज कोसळून एकाचा मृत्यु झाला असून जवळपास 10 जण जखमी झाल्याची माहिती म‍िळाली आहे.
रामटेकमधील सावनेर येथील एका मतदान केंद्रावर वीज कोसळून पोलिंग पार्टीचा पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यु झाला. तसेच 10 जण जखमी झाल्याची माहिती म‍िळाली आहे.

‍आज (15 ऑक्टोबर) विधानसभेसाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. राज्यात सर्वत्र मतदान सुरु असताना विदर्भात मात्र मतदानावर पावसाचे सावट आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. त्यामुळे विदर्भात मतदानाला सुरूवातीच्या टप्प्यात अल्प प्रतिसाद मिळत आहे.