आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Huge Nomination From Seal In Vidharbha For Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आघाडी तुटो वा महायुती अर्ज नेण्याला मात्र वेग; मेहकरामध्ये नामांकन अर्जांची सर्वाधिक विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - आघाडीतीलबिघाडी आणि महायुतीतील फक्त युतीच्याच नावाची चर्चा सुरु असतानाच पितृपक्षाची समाप्ती झाली. त्यामुळे आघाडीतील आणि महायुतीत काय होईल याकडे लक्ष देता संभाव्य उमेदवारी आपलीच लक्षात घेऊन उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी सर्वाधिक गर्दी चिखली विधानसभा मतदार संघात झाली तर अर्ज घेऊन जाण्याच्या आजच्या पाचव्या दिवसापर्यंत तब्बल ५५१ एवढे अर्ज विक्री झाली आहे.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मेहकर विधानसभा मतदार संघात सुरुवातीपासून वारे वाहत होते. असंख्य इच्छुक उमेदवारांनी मीच आगामी आमदार असल्याचे दाखवत मतदारांचे मने आणि मते वळवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आता ऐन वेळेवर आघाडी बिघाडी आणि महायुती फक्त युती राहण्यात जमा असताना इच्छुकांत तिळमात्रही फरक पडला नाही. आज पाचव्या दिवसा अखेर चिखली विधानसभा मतदार संघातील इच्छुकांनी तब्बल १०६ अर्ज नेल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मतदार संघात येणाऱ्या धाड येथील इम्रानखान उमरखान पठाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर जळगाव जामोद मतदार संघातून आज अखेर एकूण ८६ अर्ज नेल्याची माहिती आहे. तर एकच नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आला आहे. सर्वाधिक चर्चेत असलेला खामगाव मतदारसंघ या विधानसभेत मात्र थंड असल्याचे जाणवत आहेत. या मतदार संघातून आज पाचव्या या दिवसाअखेर केवळ ४१ अर्ज नेल्याची माहिती आहे. तर अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही. याच बरोबर मलकापूर विधानसभेत मतदार संघातही इच्छुकांची चांगलीच गर्दी दिसत आहे.
येथे आज पाचव्या दिवसाअखेर ८३ अर्ज नेले आहेत. तर बुलडाण्यात ५५ व्यक्तींनी ६७ अर्ज नेले आहेत. आज पाचव्या दिवशी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. मेहकर विधानसभा मतदार संघात आज पाचव्या दिवसाअखेर तब्बल १०७ अर्ज नेल्याची माहिती आहे. तर एकही उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे. सिंदखेडराजा मतदारसंघातून ६१ अर्ज नेले आहेत.
मलकापूर ८३,सिंदखेडराजा ६१, बुलडाणा ६७, जळगाव जामोद ८६, चिखली १०६. मेहकर १०७, खामगाव ४१