आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Athavale In Lonavala News In Divya Marathi

VIDEO -\"मेरी कोईभी मत करो नक्कल, नही तो मै करूंगा तेरी टक्कल\" - रामदास आठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणावळा - "मेरी कोई भी मत करो नक्कल, नही तो मै करूंगा तेरी टक्कल" अशा विनोदी शैलीत रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टिकेला उत्तर दिले. ते आज (सोमवार) लोणावळा येथे झालेल्या भाजपच्या प्रचार सभेत बोलत होते.
राज ठाकरे यांनी एका प्रचार सभेत रामदास आठवले यांची नक्कल केली होती. या टीकेला उत्तर देत आठवले यांनी राज यांना चांगलेच धारेवर धरले.आठलवले म्हणाले की "माझी नक्कल करणारा एक नेता म्हणतो मला सत्ता द्या, राज्याचं सोन करतो, पण नाशिकचा कोळसा केला त्याचं काय? त्यामुळे "मेरी कोई भी मत करो नक्कल, नही तो मै करूंगा तेरी टक्कल" अशा शब्दात राज यांना टोला लगावला. तसेच "मैं बेडुकउड्या मारता हूं ऐसा एक नेता बोलता है. मैं बेडुकउड्या नहीं, ढाण्या वाघ उडी, नहीं नहीं बिबट्या उड़ी मारता हूँ" असे म्हणत त्यांनी राज यांची चांगलीच झडती घेतली.
भाजप प्रवेशाबद्दलचे स्पष्टीकरण देताना आठवले म्हणाले की, "मी केवळ बाबासाहेबांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये आलो आहे." तसेच यावेळी बोलताना आठवले यांनी आपल्या भाषणातून वेळोवेळी आपल्यातील कवीवृत्तीची झलक दाखवली. मोदींबद्दल स्तूतीसुमने वाहताना आठवले म्हणाले "महाराष्ट्रातील जनता ही मोदींच्या नेतृत्वाला भुलणार आहे आणि लोणावळ्यात कमळ फुलणार आहे", अशा शब्दात त्यांनी भाजपचा प्रचार केला.
काँग्रेस राष्ट्रवादीला केवळ आरोप प्रत्यारोपाची सवय आहे. त्यांना जनतेशी काहीच देणे घेणे नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मोदी आणि अमित शहा हे मुस्लीम विरोधी आहेत असा सारखा प्रचार करत असतात. मात्र ते मुस्लीम विरोधी नाहीत हे मी जाणले आहे. आमच सरकार सर्वांना न्याय देण्यासाठी काम करणार आहे." असेही आठवले म्हणाले.

रामदास आठवले नंतर याच कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे भाषण झाले. ते म्हणले की, महाराष्ट्राला यंदा दहा वर्षांनंतर बोलणारा पंतप्रधान मिळाला आहे. असे म्हणत त्यांनी मनमोहन सिंग यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच साठ वर्षे सत्ता भोगणारे सरकार चार महिन्यांचा हिशोब मागत आहे अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली. मोदी सरकारने तीन महिन्यात विकासदर वाढवला आहे. तसेच जन-धन योजनेमुळे देशातील गरिब लोकांचे बँक खाते उघडले गेले. या योजनेमुळे त्यांना नक्कीच फायदा होईल, असेही ते यावेळी म्हणाले.
पुढील स्लाईडवर पाहा, रामदास आठवले यांच्या दिलखुलास विनोदी भाषणाचा व्हिडीओ...
व्हिडीओ साभार - एबीपी माझा