आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Alliance Continue, Then I Am Happy Advani, Divya Marathi

युती कायम राहिली असती तर आनंदच झाला असता, अडवाणींचा स्वपक्षीयांना टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद/मुंबई - पंचवीस वर्षांपासूनची शिवसेना-भाजप युती तुटल्याच्या मुद्द्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गुरुवारी पहिल्यांदाच मौन सोडले. युती कायम राहिली असती तर आनंदच झाला असता असे सांगत राज्यांत मित्रपक्ष प्रबळ आहेत. सरकार आले तर राज्यात त्यांचेच येईल. भाजपचे फक्त केंद्रामध्ये सरकार येईल, हे भाजपने लक्षात घेतले पाहिजे, असे अडवाणी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांना अडवाणी यांचा हा टोलाच असल्याचे मानले जात आहे. तसेही अडवाणी युती व्हावी या बाजूनेच होते. स्वच्छता अभियानानिमित्त अडवाणी गुरुवारी अहमदाबादेत होते. पत्रकारांशी बोलताना अडवाणी म्हणाले, युती तुटली नसती तर मला आनंदच झाला असता. शिवसेनेसोबतच्या जागावाटपाच्या चर्चेत मी सहभागी नव्हतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनी केल्यानंतरच मला युती तुटल्याचे समजले. त्यानंतर मी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली तेव्हा आपण हे प्रकरण हाताळत आहोत. जागावाटपाचा फॉर्म्युला बरोबर नाही, भाजपला जास्त जागा मिळायला हव्यात असे त्यांनी मला सांगितले. यापलीकडे भाजप- शिवसेना युतीबाबत आपणाला काहीही माहिती नसल्याचे स्पष्टीकरणही अडवाणी यांनी दिले.

शिवसेनेआडून मोदींवर वार
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अडवाणी भाजपच्या निर्णय प्रक्रियेतून अलगदपणे बाजूला फेकले गेले आहेत. त्यामुळे भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडल्याचे निमित्त साधून जबाबदारीची जाणीव करून देत त्यांनी मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका करण्याची संधी साधून घेतली.

सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’त
युती तुटण्याच्या बेतात होती. तेव्हाच उद्धव यांचा मला फोन आला. मी गडकरींशीही बोललो होतो, अशी कबुली अडवाणींनी दिली. उद्धव यांनी अडवाणींशी चर्चा केल्याची बातमी फक्त ‘दिव्य मराठी’नेच दिली होती.

मवाळ वि. आक्रमक
वेगळे झाल्यावर भाजपचे शिवसेनेबाबत मवाळ धोरण आहे. नंतर एकत्र येण्याची गरज भासू शकते हे पाहून शिवसेनेवर भाजप थेट टीका टाळत आहे, पण शिवसेनेने मात्र भाजपबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.