शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव यांनी बालहट्टासाठी युती तोडली असा आरोप भाजपने केला होता. त्यावेळी मला खुप वाईट वाटले होते, घटनेने मला 18 व्या वर्षी मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. तसेच कायद्याने मला 21 व्या वर्षी लग्नाचा अधिकार दिला आहे, तेव्हा 24 वर्षांचा असूनही मी अपरिपक्व कसा असा सवाल युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
'एबीपी माझा'ला वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आदित्य यांनी त्यांचे राजकीय ज्ञान पुरेपुर दाखवत
आपण आता राजकारणात उतरण्यासाठी योग्य आहोत असेही दाखवून दिले. मुलाखतीच्या सुरूवातीलाच मी भाजपवर बोलणार नाही, कारण मी केवळ 24 वर्षांचा आहे, असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.
पुढील स्लाईडवर वाचा... युती तुटल्याचे दुःख झाले...