आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Introduction About Deputy Chief Minister Ajit Pawar In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहकारी बॅंकेचे अध्यक्ष ते उपमुख्यमंत्री अजित पवार, जाणून घ्या कौटुंबीक, राजकीय माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील ज्या काही वादग्रस्त राजकारण्यांची नावे घेतली जातात त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख सर्वात वरती करावा लागेल. अजित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांचे पुतणे असून त्यांची महाराष्ट्रातील राजकारणात चांगली पकड आहे. ग्रामीण भागातील चांगली जाण असलेला तसेच तळागाळापर्यंत पोहोचलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. अजित पवार यांची महाराष्ट्रातील जनतेमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे.
'दादा' अशी ओळख असलेल्या अजित पवारांची राजकारणातही प्रेमळ दादागिरी चालते. त्यामुळेच त्यांच्या कामांपेक्षा राजकारणात वादग्रस्त वक्तव्यांमुळेच त्यांची जास्त ओळख आहे. अजित दादांनी एखादे वादग्रस्त वक्तव्य केले की, लगेच सावरायला नेहमी त्यांचे काका म्हणजेच शरद पवारांना धाव घ्यावी लागते. यावरूनच की काय दोघां काका-पुतण्यांमध्ये खटके उडत असतात. तरीही या दोघांचे राजकीय क्षेत्रात मोठे नाव आहे. त्यामुळेच शिक्षणानंतर अवघ्या काही वर्षातच ते एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले आणि त्याच वर्षी विधानसभेत निवडूनही आले. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. एका नंतर एक अशी यशाची शिखरे पादाक्रांत करत आज हा नेता राज्याचा उपमुख्यमंत्री पद भूषवतो आहे.
कौटुंबिक माहिती
अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे त्यांच्या आजोळी कुटुंबात झाला. अजित पवार यांची आई देवळाली प्रवरा येथील कदम घराण्यातील होत्या, तर शरद पवारांचे मोठे भाऊ असलेले अजित दादांचे वडील अनंतराव पवार हे व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टूडिओमध्ये नोकरीला होते.

अजित दादांचे आजोबा गोविंदराव पवार हे बारामती सहकारी खरेदी विक्री संघामध्ये नोकरीला होते तर आजी शारदाबाई या काटेवाडीतील शेती सांभाळात असत. शरद पवार त्यंच्या भाषणातून नेहमी त्यांच्या आईचा म्हणजेच शारदाबाईंचा उल्लेख करतात. तर याच माऊलीचे संस्कार अजित पवारांनाही मिळाले आहेत. सर्व सामान्य कुटुंबात वाढलेल्या अजित दादांचे आयुष्य सुरूवातीला अत्यंत सामान्य आणि हाल अपेष्टांमधून गेले. त्यामुळे मानवी जीवनातील दुःख, दारिद्य, अडचणी यांची पुरेपुर जाण अजित दादांना आहे.
अजित दादांचे लग्न सुनेत्रा पवार यांच्याशी झाले. त्यांना पार्थ आणि जय असी दोन आपत्ये आहे. तर अजित पवारांची चुलत बहीण आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे ह्या सुध्दा राजकारणात चांगली कामगिरी बजावत आहेत.
अजित दादा यांचा राजकीय प्रवास
अजित पवारांचे शालेय शिक्षण देवळाली प्रवरा येथेच झाले. त्यानंतर ते मुंबईत त्यांचे काका शरद पवार यांच्याकडे दहावीनंतरच्या शिक्षणासाठी आले. तोपर्यंत शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीने चांगलाच वेग घेतला होता. महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करून दादांनी पुन्हा बारामती गाठली या कर्मभूतीतील सहकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. थोड्याच वेळात अजित पवारांनी या क्षेत्रात चांगली पकड घेतली. यानंतर 1991 ला त्यांची पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि त्याचवर्षी ते विधानसभा निवडणूकीत भरघोस मतांनी निवडूनही आले. या विजयानंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्री झाले. त्याबरोबरच याच वर्षाच्या जून ते सप्टेंबर दरम्यान त्यांनी लोकसभेच्या निवडणूकीत आपला झेंडा गाडला आणि खासदार बनत संसद गाठली. त्यानंतर अजित पवारांनी फिरकूनही मागे पाहिले नाही.

राजकीय प्रवास सुरुवातीपासून ते आतापर्यंत ....
१७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१. (लोकसभा सदस्य)
१९९१ ते १९९५ (विधानसभा सदस्य)
नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ - राज्यमंत्री, जलसंधारण, ऊर्जा व नियोजन
२८ जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२ - राज्यमंत्री, कृषी, फलोत्पादन आणि उर्जा
१९९५ ते १९९९ - विधानसभा सदस्य
१९९९ ते २००४ - विधानसभा सदस्य
२७ ऑक्टोबर १९९९ ते २५ डिसेंबर, २००३ - मंत्री, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन
२००४ ते २००९ - विधानसभा सदस्य
२६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ - मंत्री, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे(कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे)
नोव्हेंबर २००९ - विधानसभा सदस्य
९ नोव्हेंबर, २००४ ते ७ नोव्हेंबर, २००९ - मंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता
७ नोव्हेंबर, २००९ ते ९ नोव्हेंबर, २०१० - मंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), ऊर्जा
११ नोव्हेंबर २०१० ते २९ सप्टेंबर २०१२ पर्यंत. ७ डिसेंबर २०१२ पासून आजपर्यंत - उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन, ऊर्जा)
पुढील स्लाईडवर पाहा, अजित पवारांची कौटुंबिक छायाचित्रे....

(टीप: या लेखातील अनेक फोटो 'अजित पवार' यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून घेण्यात आलेले आहेत.)