आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Investor Hijack Media Said Nandu Madhav News In Divya Marathi

भांडवलदारांनी निवडणूक हायजॅक केल्यानेच पराभव - नंदू माधव यांचे स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘लोकसभानिवडणुकीच्या वेळी आम आदमी पक्षाची थोडी हवा होती. मात्र, भांडवलदार पक्षांनी निवडणूक हायजॅक केल्यामुळे त्यावेळी आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच विधानसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे,’ असे स्पष्टीकरण प्रसदि्ध अभिनेते नंदू माधव यांनी दिले. बीड लोकसभा मतदारसंघातून नंदू माधव यांचा पराभव झाला होता.
टपाल चित्रपटाच्यानिमित्ताने ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला दिलेल्या भेटीप्रसंगी त्यांनी निवडणुकीविषयीही चर्चा केली. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यामुळे पुन्हा एकदा बीड लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. मात्र, माझ्याकडे मॅन आणि मनीपॉवर नसल्याने आता निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुरुवातीला लोक ‘तुम्ही उभे राहा, निवडणूक लढा, आम्ही पाठीशी आहोत’ असे म्हणतात. पण, नंतर ते भांडवलदारांकडे आकर्षित होत असल्याचा अनुभवही त्यांनी बोलून दाखवला.
अन्न, पाणी आणि निवारा अशा किमान गरजा असलेल्या रचनेवर काम करणारा ‘आप’ हा पक्ष आहे. त्यामुळे तुम्हीच बघा आमच्या कोणत्याही नेत्याकडे वा कार्यकर्त्याकडे इतर पक्षांतील आमदार-खासदारांप्रमाणे संपत्ती जमा झालेली नाही. काँग्रेस काय आणि भाजप काय यांनी जिथे-जिथे आमचे उमेदवार उभे होते, त्या ठिकाणी पैशांचे राजकारण केले. दुसरे म्हणजे अनेक माध्यमेच भांडवलदारांनी काबीज केल्यानेही त्याचा मोठा परिणाम झाला. याबरोबरच त्यावेळी सोशल मीडियाचाही मोठा हातभार लागलेला होता. आमच्याबाबत अनेकांनी निगेटिव्ह बातम्या पसरवल्या. माध्यमांनी त्या अधिकच निगेटिव्ह करून पसरवल्या. त्यामुळे लोकांमध्येही एक वेगळा संदेश गेला, अशी अनेक कारणं ‘आप’च्या पराजयाला कारणीभूत ठरल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

विरोधाभास -
केजरीवालांनीमुख्यमंत्रिपदाच्या काळात आंदोलन केले, ते माध्यमांना खटकलं. पण जयललिता, मोदींनीही आंदोलन केली होती, त्या वेळी माध्यमे त्यांच्या बाजूने होती. असा विरोधाभास घडत आल्याचे नंदू म्हणाले.
काँग्रेसकडून विश्वासघात
दिल्लीतील सत्ता आम्हाला सोडावी का लागली, याचा कोणी विचार केला का? काँग्रेसच्या पाठिंब्यावरच आम्ही तेथे सत्तेवर बसलो होतो ना? जनलोकपाल हा आमचा प्रमुख मुद्दा होता. त्याला पाठिंबा द्यायची वेळ आली तेव्हा काँग्रेसने विश्वासघात केला. मग आमचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सत्ता सोडण्याचं धाडस दाखवलं. पण, माध्यमांनी त्याचं वार्तांकन वेगळ्या पद्धतीने केलं. यापूर्वी अनेक मोठ्या नेत्यांनी आपल्या मोठ्या पदांची सत्ता साेडली आहे. त्यावेळी मात्र माध्यमे त्यांच्या बाजूने होती.