आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Assembly Constituency Shivsena Candidates Suresh Jain News In Divyamaratyhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्वपरीक्षा:जळगाव जिल्ह्यातील राजकीय सरदारांसमोर आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगाव जिल्ह्यात अनेक वर्षांपासून राजकीय प्रभाव असलेल्या मतदारसंघात राजकारण व्यक्तीकेंद्रित राहिले आहे. विरोधातील उमेदवार कोण, यावरून तेथील स्थितीचा अनुमान काढला गेला आहे. या वेळी सर्वच पक्ष स्वबळावर लढणार असल्याने व्यक्ती केंद्रित मतदारसंघातील स्थितीचे विश्लेषण केले जात आहे. दहाव्यांदा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणारे आमदार सुरेश जैन, सहाव्यांदा रिंगणात उतरलेले वि‍रोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि जामनेरमधून पाचव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केलेले आमदार गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील या वेळच्या राजकीय घडामोडी नव्या वळणावर आल्या आहेत.
'जळगावच्या स्थानिक राजकारणात वैयक्तिक प्रभावामुळे चर्चेत असलेले जळगाव शहर, मुक्ताईनगर, जामनेर या मतदारसंघातील राजकीय सरदारांसमोर या वेळी प्यादे जेरीस आणणार असल्याने या मतदारसंघातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वर्षानुवर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार या वेळी उमेदवारांच्या भाऊगर्दीत कोणती समीकरणे उपयोगात आणतात, यावर त्यांच्या विजयाची गणिते अवलंबून राहतील.'

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, जळगाव शहरातून सुरेश जैन दहाव्यांदा रिंगणात...