आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon, Vidhansabha Election News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खान्देशात भाजप, राष्ट्रवादीला लाभ; जळगाव, धुळ्यात काँग्रेस, शिवसेनेचा अस्तित्वासाठी संघर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - युती, आघाडी तुटल्यामुळे खान्देशातील सर्व वीस मतदारसंघांमध्ये चौरंगी लढती होतील. सद्य:स्थितीत काँग्रेस, शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी आणि भाजपची ताकद अधिक असल्यामुळे खान्देशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची सरशी होऊ शकते.
जळगाव जिल्ह्यात अकरा मतदारसंघ आहेत. त्यापैकी सहा ठिकाणी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. भाजप तीन, शिवसेना दोन आणि काँग्रेस एक अशी स्थिती आहे. राष्ट्रवादी आणि भाजपची तयारी अधिक होती. त्यांच्याकडे प्रवेश करून घेण्यासाठी विद्यमान आमदारही इच्छुक होते. राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी हे उमेदवारी दाखल करणार आहेत. पण आता शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी असेल. काँग्रेसतर्फेही रवींद्र पाटील उमेदवार असू शकतात. त्यामुळे खडसेंची लढतही चुरशीची होईल. अशीच काहीशी स्थिती जळगाव शहर मतदारसंघाची आहे. या मतदारसंघात शिवसेनेतर्फे सुरेश जैन हे तुरुंगातून उमेदवारी दाखल करणार आहेत. त्यांच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी, मनसे यांच्या उमेदवारीमुळे आव्हान उभे राहणार आहे. जवळपास सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती होतील. पण सरशी भाजप आणि राष्ट्रवादीची होऊ शकेल.
धुळे जिल्ह्यात पाच मतदारसंघ आहेत. त्यापैकी अनिल गोटेंच्या प्रवेशामुळे भाजप दोन, शिवसेना एक आणि काँग्रेसचे दोन ठिकाणी आमदार आहेत. या पाचही मतदारसंघांमध्ये चौरंगी लढती होतील. सर्वच मतदारसंघांमध्ये जे विद्यमान आमदार आहेत. त्यापैकी साक्रीच्या आमदारांचे काँग्रेसने तिकीट कापले आहे. अन्य चौघे पुन्हा उमेदवारी करणार आहेत. मात्र, त्यांच्यापुढे विजयाचे आव्हान असणार आहे. तरीही धुळे, धुळे ग्रामीण, शिंदखेडा येथे राष्ट्रवादीला आणि साक्री, शिरपूर या दोन ठिकाणी भाजप किंवा काँग्रेसला अनुकूल परिस्थिती राहील.
गावितांचेभवितव्य पणाला
नंदुरबारजिल्ह्यात डॉ. विजयकुमार गावित यांनी भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे इथे लढत चौरंगी झाली तरी त्यांचे पारडे जड राहील. त्यांचे बंधू शरद गावित नवापुरात राष्ट्रवादीतर्फे लढतील. मात्र, त्यांना अनुकूल वातावरण नाही. भाजप आता कुणाला उमेदवारी देते आणि डॉ. गावितांची भूमिका इथे काय राहील, हे पाहायला लोकांना आवडेल. तळोदा आणि अक्कलकुवा या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र, चौरंगी लढतीत इथे भाजपने ताकद लावली तर डॉ. गावितांच्या मदतीने त्यांची सरशी होऊ शकते.