आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Latest News In Marathi Narayan Rane In Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादी काँग्रेसला 124 जागांचा प्रस्ताव, दोन दिवसात यादी जाहीर करणार - राणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील भांडण मुख्यमंत्रीपदासाठी नसून जागांवरुन आहे. दोन दिवसात राज्याच्या भल्याचा निर्णय होईल. मोदी लाट ओसरली असून राज्यात आमचीच सत्ता येईल, असा विश्वास काँग्रेसचे राज्यातील प्रचार प्रमुख नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसला 124 जागा देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीने 144 पेक्षा एक जागा कमी घेणार नसल्याचे सांगत स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे.
विधानसभेच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून काँग्रेसचे नेते, पदाधिकार्‍यांची बैठक आज (रविवार) येथील शहानूरवाडी रोडवरील श्रीहरी पॅव्हेलियन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्याआधी बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. औरंगाबादसह मराठवाड्यातील काँग्रेसच्या जागा लढवण्याची रणनीती, उमेदवारांची निवड तसेच राष्ट्रवादीकडून काही मतदारसंघांची होणारी मागणी आदी मुद्यांवर स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. शिवाय आघाडी झाली नाही तर नेमकी कार्यकर्ते, उमेदवारांची काय तयारी आहे, याचीही चाचपणी करण्यात आली. बैठकीस सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित होते.