आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divyamarathi News Uddhav Thackeray Akola Rally Maha Poll 2014

उद्धव ठाकरेंची मोदींवर प्रथमच टीका, म्हणाले- \'तुम्ही भाजपचे नाही देशाचे पंतप्रधान\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अकोल्याच्या प्रचारसभेत बोलताना केली. शिवसेनेच्या अकोला जिल्ह्यातील पाचही उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी दुपारी रादेगो महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.
केंद्रात महायुतीचे सरकार असले तरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही ठाकरे यांनी व्यक्त केला. संकटकाळात साथ देणाऱ्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून केंद्रातील सत्ता मिळवली आणि सेनेला खड्यासारखे बाहेर काढले. परंतू शिवसेनाप्रमुखांचे संस्कार आमच्यावर झालेले असल्याने आम्ही आलेली आव्हाने खंबीरपणे परतवून लावू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही पंचवीस वर्षे एकत्र राहिलो. कालपर्यंत भाजपला हिंदूत्व, भगव्याची साथ हवी होती. आता मित्र नकोसा झाला. अशा विश्वासघातकी लोकांवर विश्वास ठेवायचा कसा, या शब्दात ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. सेनेचे विभागीय संघटनमंत्री आ. दिवाकर रावते, अकोला पश्चिमचे सेनेचे उमेदवार गुलाबराव गावंडे, अकोला पूर्वचे गोपीकिशन बाजोरिया, अकोटचे संजय गावंडे, मूर्तिजापुरचे महादेव गवळे, बाळापुरचे कालीन लांडे, जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, महागरप्रमुख तरुण बगेरे, महिला आघाडीच्या ज्योत्स्ना चोरे, सेनेचे नेते मिलिंद नार्वेकर, राजेश मिश्रा मंचावर होते.

माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, माजी महापौर सुरेश पाटील, उद्योगपती विवेक पारसकर, सुरेश देशमुख, श्रीकृष्ण ढोरे, माजी नगरसेवक नंदू ढोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ऊन-पावसाच्या खेळात झालेली सभा आटोपून दुपारी 3 वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे चिखली येथील सभेसाठी रवाना झाले.