आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात आतापर्यंत साडेचौदा कोटी, तर 75 लाख रुपयांची अवैध दारु पकडण्‍यात आली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत "लक्ष्मीदर्शना'ला चांगलाच जोर आला असून पैशांसह दारूचा महापूर वाहत आहे. राज्यात निवडणूक जाहीर झाल्यापासून आजवर १४.५ कोटी रुपयांची रोकड व ७५ लाख रुपयांची अवैध दारू पकडण्यात आली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकांनी राज्यात आजवर १४ कोटी ५२ लाख ३७ हजार ८७६ रुपयांची रोकड जप्त केली आहे. शिवाय ७५ लाख ९९ हजार रुपयांची २.८ लाख लिटर दारूही पकडण्यात आली आहे. यातील केवळ ४.८ लाख रुपयेच उमेदवारांचे असल्याचे निवडणुक आयोग म्हणतो.मतदारांना प्रलोभने देऊ मत विकत घेणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी आयोगाने प्राप्तिकर आणि जकात व अबकारी खात्यासारख्या केंद्रीय महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची पथके राज्यात तैनात केली आहेत.