आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News MNS Chief Raj Thackeray Rally At Nilanga

मराठावाड्यात पाणी नसताना साखर कारखाने उभारतातच कसे? राज ठाकरेंचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निलंगा/ लातूर - मराठवाड्याने एवढे मुख्यमंत्री राज्याला दिली मात्र, त्यांनी मराठवाड्याला काहीही दिली नाही अशी टीका राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यावर केली. निलंगेकर मुख्यमंत्री होते, त्यांनी लातूरसाठी काय केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री होते. मात्र मराठवाड्यात काहीही बदल झालेला नाही. या नेत्यांनी फक्त आपल्या वारसांना मोठे केले आणि स्वतःची घरे भरली, असा आरोप राज ठाकरेंनी केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणुकीनिमीत्त मराठवाडा दौर्‍यावर आहेत. एका दिवसात तीन ते चार सभा ते घेत आहेत. संध्याकाळच्या सभा सोडल्या तर त्यांच्या सर्व सभा या दुपारी कडक उन्हात होत आहे. त्यामुळे राज चाहत्यांना तळपत्या उन्हात त्यांची वाट पाहात बसावे लागत असल्याचे चित्र निलंग्यात पाहायला मिळाले. दुपारी सव्वाला राज ठाकरे यांचे मंचावर आगमन झाले. टळटळीत उन्हात त्यांनी भाषणास सुरवात केली. कडक उन्हात बसलेल्या चाहत्यांना राज म्हणाले, यासाठी मला दोष देऊ नका, निवडणूक आयोगाने ऐन ऑक्टोबर हीट आणि सणासुदीच्या काळात निवडणुका ठेवल्या आहेत. हा त्यांचा दोष आहे.
चारही राजकीय पक्षांनी तुम्हाला गृहीत धरले आहे, त्यांचा हा विश्वास तुम्हाला मोडायचा आहे, असे अवाहन त्यांनी मतदारांना केले.