आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फॉर्म्युल्याच्या वक्तव्याचा जाब विचारताच जानकर भाजपत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रासपनेते महादेव जानकर यांनी बुधवारी रात्री महायुती कायम राहणार असल्याचे सांगत जागावाटपाचा फॉर्म्युला सर्वांनाच मान्य असल्याची घोषणा केली होती. मात्र, गुरुवारी जागावाटपाचा हा फॉर्म्युला धुडकावून लावत भाजपने शिवसेनेशी काडीमोड घेतला. अशा परिस्थितीत जानकर यांनी भाजपसोबत जाण्याचे मान्य केले. या निर्णयामुळे शिवसेनेत जानकरांच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानकर यांनी बुधवारी रात्री घटक पक्षांना १४ तर शिवसेनेला १५१ भाजपला १२३ जागा देण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाल्याचे माध्यमांना सांगितले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्याने भाजप नेते चकित झाले. कारण हा नवा फॉम्युर्ला भाजपला मान्य नव्हताच. त्यामुळे गुरुवारी सकाळी भाजप नेत्यांनी जानकर यांची भेट घेऊन वरील वक्तव्याबाबत जाब विचारला. त्यावर जानकरांनी शिवसेनेकडे बोट दाखवले. त्यावर संतापलेल्या भाजपने ‘अन्य घटक पक्षांसोबत आम्ही वेगळे लढू, तुम्ही शिवसेनेचे एवढे ऐकता तर त्यांच्या सोबतच जा,’ असे जानकरांना सुनावले. यामुळे जानकरांच्या गोटात खळबळ उडाली तसेच त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

भाजपबरोबर राहिल्यास जास्त फायदा होऊ शकतो हे लक्षात आल्यामुळेच सायंकाळी भाजपच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून त्यांना सर्व घटक पक्ष भाजपसोबतच आहेत, असे जाहीरपणे सांगावे लागले.