आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assemble Election 2014 News In Marathi, Divya Marathi

कोलांटउडी स्पेशालिस्ट : मनसे वगळता रिंगण पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पक्षनिष्ठा हा एकेकाळी राजकीय जीवनात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा निकष आता जवळपास नामशेष होत चालला आहे. स्वबळामुळे जिंकणे हाच निकष महत्त्वाचा ठरल्याने जो ‘सर्वार्थाने सक्षम’ तो आपला उमेदवार हेच तत्त्व झाले. ऐनवेळी स्वत:च्या पक्षाने तिकीट नाकारले म्हणून किंवा दुस-याच पक्षाने तिकीट दिले म्हणून अशा विविध कारणांनी पक्षांतर केले. अगदी वर्षभराच्या काळात तीन -चार वेळा पक्षांतरे करण्याचा पराक्रमदेखील काहींनी केला, असे ‘कोलांटउडी स्पेशालिस्ट’.
मनसे वगळता रिंगण पूर्ण
राष्ट्रवादी काँग्रेसमधून पंचायत समिती सभापती या नात्याने माणिकराव कोकाटे १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत तिकिटाचे प्रमुख दावेदार होते. मात्र, राष्ट्रवादीने उमेदवारी तुकाराम दिघोळेंना दिल्याने कोकाटेंनी शिवसेनेची उमेदवारी घेऊन विधानसभेत प्रवेश केला. २००४ मध्ये दुस-या वेळीही ते सेनेच्याच तिकिटावर आमदार झाले, २००९ च्या निवडणुकीत काँग्रेस प्रवेश करून सिन्नरचा गड राखण्यात यश मिळवले. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना मदत करीत शिवसेना प्रवेशाची फिल्डिंग लावली. मात्र, शिवसेनेने आधीच वाजे यांना उमेदवारी दिल्याने कोकाटेंचा संभ्रम वाढला. त्यात ऐनवेळी युती तुटल्याने कोकाटेंनी आदल्या दिवशी रात्री भाजपत प्रवेश करून दुस-या दिवशी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.