आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली की बिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिल्लीत बसून महाराष्ट्राच्या सत्तेची स्वप्ने पाहणा-या भाजपला लोकसभेनंतर इतर राज्यांत झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुका जिंकता आल्या नाहीत,’ असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी नरेंद्र मोदींचे नाव न घेता 'दिल्ली की बिल्ली' अशा शब्दांत त्यांची खिल्ली उडवली. कल्याण पूर्व मतदारसंघातील शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उद्धव यांनी पुन्हा एकदा मोदींना टार्गेट केले. यापूर्वीही तुळजापुरातील जाहीर सभेत ‘अफझल खानाची फौज महाराष्ट्रावर चाल करून आली आहे,’ अशा शब्दांत उद्धव यांनी मोदींना लक्ष्य केले होते. त्यानंतर भाजप व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. मात्र त्यानंतर घूमजाव करत उद्धव यांना ‘आपण फक्त टोपी फेकली होती, त्यांनी डोके घातले,’ असे सांगावे लागले.