मुख्यमंत्रिपदासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव ऐकल्यावर मला रडू आलं, अशी उपहासात्मक टीका आठवलेंनी राज ठाकरेंवर केली आहे. कांदीवलीतील सभेत राज ठाकरे यांनी आरपीआय नेते रामदास आठवलेंवर टीका केली होती. या टीकेला बदलापुरात रामदास आठवलेंनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्र पेटवून टाकतील आणि मला ते विझवावं लागेल असंही ते पुढे म्हणालेत.
डिपॉझिट जप्त करणार
काँग्रेसचे नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचे विळ्या भोपळ्याचे सख्य आघाडीतील फुटीमुळे अधिकच तीव्र झाले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या हंगामातदेखील एकमेकांबाबत उखाळ्यापाखाळ्या काढण्याचे दोघांचेही ‘उद्योग ’ सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वी राणे यांनी यांनी आमचे घराणे सगळ्याची सव्याज ‘परतफेड’ करते, असे म्हणत सांकेतिक भाषेत भास्कर जाधवांना पाडण्याची भाषा केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना भास्कर जाधव यांनी गुरुवारी राणेंच्या काेकणातील उमेदवारांचे डिपॉझिटच जप्त करेन, असे म्हटले आहे.