आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi

पत्रकारांना ‘लक्ष्मी’दर्शनाचा योग...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थोडंसं चेह-यावरून भविष्य सांगण्याची कला मला अवगत अ‍ाहे. पत्रकारांचेही चेहरे बघितले अ‍ाहेत. येत्या १० - १२ दिवसांत मोठ्या लक्ष्मीदर्शनाचा योग दिसतोय. प्रत्येकाचे पॅकेज वेगळे. पत्रकारांचे वेगळे, वर्तमानपत्रांचे वेगळे, संपादकांचे वेगळे, मालकाचे वेगळे सगळे भिडून अ‍ाहेत. सोनिया गांधी , शरद पवार ज्यांच्याकडून जे मिळेल ते लुटून घ्या. लूट लो, लूट लो, अपने बाप का माल है. जे खायचंय ते खाऊन घ्या, अशा अत्यंत विकृत शब्दांमध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ाणि केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांवर टीका केली.

हे चेहरे पाहून मतेसुद्धा मिळणार नाहीत
नेहमी मोदींचं गुणगान गाणारे राज ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला. कशाला पाहिजे काँग्रेस आणि कशाला पाहिजे भारतीय जनता पार्टी. तुम्हाला केंद्रात सत्ता दिली आहे ना, मग ती नीट सांभाळा, महाराष्ट्र सांभाळण्यासाठी आम्ही खंबीर आहोत, अशा शब्दांत राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. २० सभा किंवा ४० सभा घ्या, पण शेवटी काय तर मोदीच. हे लोकं यांचे फोटोसुद्धा जाहिरातीत टाकत नाहीत. महाराष्ट्रातील भाजपचे जे नेतृत्व अ‍ाहे, त्यांचे चेहरे पाहून यांना मतंही मिळण्याची शक्यता नाही, असा टोलादेखील राज ठाकरे यांनी या वेळी लगावला.

... असं बाळासाहेब म्हणायचे, मी नाही
शिवसेना-भाजप युती तुटली. ते होणारही होतं आणि एका दृष्टीने ते बरंही झालं. बाळासाहेबांचं भाजपबद्दल ठाम मत होतं. ते आपल्या भाषणात नेहमी त्या पक्षाचा उल्लेख भाजप न करता ‘कमळाबाई’ करायचे. ही कमळाबाई राहते आमच्या युतीत, पण हिचं लक्ष सतत दुस-या पक्षाकडं असतं. अर्थात, हे सगळं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, मी म्हणत नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी सेना-भाजप फुटीबद्दल भाष्य करताना स्वत: नामानिराळे राहत त्यांचे वाक्चातुर्यातील कौशल्य पुन्हा एकदा दाखवून दिले.