‘मला ‘करप्शन’चा प्रचंड राग येतो. मी करप्शन करत नाही, करू देत नाही. मी कालपण स्वच्छ होतो, आज पण स्वच्छ आहे, आणि उद्या पण स्वच्छ राहीन,’ असा दावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.विरोधकांनी फक्त माझं नाव गोवून बदनाम करण्याचं कारस्थान केलं. राज्याचं सिंचन क्षेत्र वाढवलं, सिंचन क्षेत्र वाढवणे हा घोटाळा नाही, असेही ते म्हणाले.
करू नका नक्कल नाही तर करीन टक्कल
‘मी बेडूक उड्या मारत नाही तर ढाण्या वाघासारखी उडी मारतो, बंद करा माझी नक्कल, अन्यथा करीन मी तुमचे टक्कल’ अशा स्टाइलमध्ये रिपाइं नेते रामदास आठवले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले. ‘बेडकाप्रमाणे आठवले या पक्षातून त्या पक्षाकडे उड्या मारतात’ अशी टीका राज यांनी नक्कल करीत केल्यानंतर वाद आणखी चिघळला आहे.