आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi

‘नरेंद्र मोदी विरोधी पक्षनेते’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपसह सर्वच पक्षांनी आठवडाभरापासूनच रंग भरण्यास प्रारंभ केला होता. त्यामुळे काँग्रेसचे केंद्रीय नेते त्याला कसे प्रत्युत्तर देतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले होते. महाडमध्ये झालेल्या पहिल्याच सभेत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा कडक शब्दात समाचार घेतला. मात्र ‘गेल्या ६० वर्षांत देशात विकास झालाच नाही’, असा आरोप मोदी करीत आहेत, हे सांगताना राहूल यांनी मोदींचा उल्लेख चक्क ‘विरोधी पक्षनेते’ असा केला. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मात्र ही चूक त्यांनी भाषणातून दुरूस्त केली नाही.

मोदी म्हणजे शाहरुख खान
विधानसभेच्या प्रचारात सर्वच नेत्यांनी नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. मुंबईतील मागाठणे विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस उमेदवार सचिन सावंत यांच्या प्रचारसभेत उत्तर प्रदेशातील कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रिटा बहुगुणा-जोशी यांनीही मोदींची खिल्ली उडवली. ‘लोकांना मदत करण्याऐवजी फॅन्सी ड्रेस घालण्याकडे अधिक लक्ष देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला शाहरुख खान समजतात’, असा टोला त्यांनी लगावला.