आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi

ओवाळून टाकलेले लोक ‘राष्ट्रवादी’त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘राष्ट्रवादी काँग्रेस ही उपद्रववादी पार्टी आहे. या पक्षाचे राजकारणच पाडापाडीचे व फोडाफोडीचे आहे. कारण या पक्षात गावागावांतून ओवाळून टाकलेले लोक आहेत. पवार काका-पुतण्यांनी कुरघोड्या करून माझा मुलगा नीलेशला पाडलं. काँग्रेसला थांबवून राष्ट्रवादीला मोठा पक्ष करण्याचा अजित पवारांचा डाव आहे. मात्र अजित पवार आयुष्यात कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत. त्यांच्यात त्याची ना गुणवत्ता आहे ना क्षमता,’ अशी टीका काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी इंदापुरातील सभेत केली. ‘आर. आर. पाटील यांनी पोलिस खात्याची पार वाट लावून टाकली आहे. नाहीतरी पोलिसांकडे तंबाखू मागणा-या गृहमंत्र्यांचा वचक कसा काय बसणार?’ अशा शब्दात त्यांनी आबांची खिल्लीही उडवली.

पवार, ठाकरे बंधू गल्लीपुरतेच नेते
भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना व राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून मोदी आमचे नेते आहेत. राज्यात आपल्या पक्षाचे सरकार आणण्यासाठी मोदी सभा घेत असतील, तर त्यात चुकीचे काय? भाजप आणि काँग्रेस वगळता राज्यातील इतर पक्ष प्रादेशिक असून त्यांच्या नेत्यांनी कितीही घसा कोरडा केला, तरी त्यांचे नेते केवळ गल्लीपुरतेच मर्यादित आहेत. अगदी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गल्लीपुरतेच मर्यादित नेते असल्याचा टोलाही खडसे यांनी लगावला.