विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारीचा महत्त्वाचा टप्पा संपल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. राजकीय पक्षांची रणधुमाळी सुरु झाली आहे. कुठे विकासाच्या मुद्दा पुढे केला जात आहे तर कुठे नेते मंडळीची एकमेकांवर नुसतील आरोपप्रत्यारोपांची चिखलफेक सुरु आहे. यंदा पहिल्यांदा राज्यात सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढताना दिसत आहे. कुठे भाऊविरुद्ध भाऊ, काकाविरुद्ध पुतण्या तर कुठे सख्ख्या बहिणी आमनेसामने एकमेकांविरोधात लढणार आहेत.
आपल्या देशातील बहुतांश राजकारण्यांची मुले परंपरेनुसार राजकारणाचा वारसा चालवतात. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांनी आपापल्या वारसांना पुढे करत विधानसभेत पाठवण्याची तयारी केली आहे. यंदा बाप-लेकच नव्हे तर काका- पुतण्या, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा काकाविरुद्ध पुतण्या मैदानात....