आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra CM Comment On NCP Sharad Pawar After Breakup Alliance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘राष्ट्रवादीला केंद्रातल्या सत्तेचे लाभ पाहिजेत’; पृथ्वीराज चव्हाण यांचा शरद पवारांवर आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या सत्तेत राहायचे आहे. महाराष्ट्राच्या हितापेक्षा त्यांचे वैयक्तीक हितालाच अधिक प्राधान्य आहे. म्हणूनच राज्यातली १५ वर्षांची आघाडी तोडण्याचे पाऊल राष्ट्रवादीने उचलले’, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा मिळाल्या. त्यामुळे तब्बल ३० जागा राष्ट्रवादी वाढवून मागत होती. आम्ही १० अधिक जागा देण्याची तयारी दाखवली होती. तरीही निम्म्या जागांचा राष्ट्रवादीचा आग्रह कायम होता. ती मागणी पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे आघाडीची चर्चा थांबवण्यात आली होती, असे चव्हाण म्हणाले.

भाजप-राष्ट्रवादी छुपी युती ; महायुतीतुटताच तासाभरात आघाडी तोडण्याचा राष्ट्रवादीने निर्णय घेतला. हा योगायोग नाही. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात छुपी युती आहे, या शिवसेनेने केलेल्या आरोपात तथ्य आहे, असेही चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादीने आघाडी सरकारचा पाठींबा काढल्याचे समजले. त्याबाबत विधिज्ञांचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस यावेळी बहुमतात येईल, असा दावाही चव्हाण यांनी केला.