आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Elections Youth Involvement News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, विधानसभा निवडणुकीत तरुणांचा सहभाग, अपेक्षा आणि सक्रियता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकांची चर्चा लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतरच सुरू झाली होती. यावेळचे चित्र हे आधी झालेल्या निवडणुकांपेक्षा खुप वेगळे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडेंसारख्या मातब्बर नेत्यांच्या अनुपस्थितीने महाराष्ट्राच्या राजकारणात खुप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात शरद पवारांखेरीज दुसरा कोणी म्हणावा तसा 'मास लीडर' नाही. तेदेखील सध्या केंद्रातच वास्तव्यास आहेत. यावेळच्या निवडणुकांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे राज ठाकरे यांची स्वतः निवडणूक लढवण्याची घोषणा. यालाच उत्तर म्हणून आता शिवसेनेतूनदेखील उद्धव ठाकरेंचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केले जात आहे. त्यामुळे हे दोघेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची कल्पना येते. भारतीय जनता पार्टीमधून नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांच्याशिवाय गोपीनाथ मुंडेंची कन्या पंकजा मुंडे यांचे नावही मोठ्या प्रमाणावर पुढे केले जात आहे.
एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि दुसरीकडे भाजप-शिवसेनेत जागावाटपावरून सुरू असलेला वाद महाराष्ट्रातील जनतेला गोंधळात टाकणारा आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीवर वेगवेगळ्या कारणांवरून लोकांची नाराजी दिसून येत आहे. तरी मराठा आरक्षणासारखा कायदा आणण्याचे आश्वासन देऊन थोडीफार सारवासारव करून करण्याचा प्रयत्न केला. आता हे चारही पक्ष युती टिकवणार की स्वबळावर निवडणूक लढवण्याची वेळ यांच्यावर येणार हे तर येणारा काळच ठरवेल. जर भारतीय जनता पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाच तर त्यांच्या 'स्वतंत्र विदर्भा'च्या मुद्दयाला दिलेला पाठींबा त्यांना विदर्भातील थोडीफार मते मिळवून देऊ शकतो. ऑगस्टमध्ये शिवसेनेने मुंबई शहराचे व्हिजन डॉक्यूमेंट सादर केले होते, त्याचा मनसेच्या 'ब्लू प्रिंट' वर किती परिणाम होईल हे पाहणे रंजक ठरेल. परंतू महाराष्ट्रात मोदी लाट टिकणार का असाही मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि आंध्रप्रदेशात झालेल्या बायपोल्समध्ये मोदींची लाट फारशी आढळून आली नाही.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानात तरुणांचा सहभाग अधिक होता यात काही शंका नाही. परंतु हाच उत्साह विधानसभेच्या वेळीदेखील राहणार का हा प्रश्न निर्माण होतो. देशाप्रमाणे राज्यातही सत्तापरिवर्तन होणार का याचे उत्तर निकालानंतर मिळेलच.
महाराष्ट्रातील सर्वसामान्या तरुणांची याबद्दलची काही मते- पुढील स्लाईडवर क्लिक करा...