पंकजा मुंडे
मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण देण्यास समर्थन देणारा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकटा निवडणूक लढवत आहे. तरी देखील या पक्षाकडून महिलांना 10 टक्के उमेदवारी देखील देण्यात आलेली नाही. विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी राष्ट्रवादी 283 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तरी देखील यावेळी राष्ट्रवादीतर्फे केवळ 16 महिलांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. तर कॉँग्रेसने सर्वाधिक 27 महिलांना तिकिट दिले आहे. भाजपने 21 महिलांना विधानसभेचे तिकिट दिले आहे. या सर्वाच्या तुलनेत शिवसेनेने केवळ 10 महिलांना उमेदवारी दिली आहे.
2009 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कॉँग्रेसने 174 जांगापैकी 12 जागांवर महिला उमेदवारांना तिकीट दिले होते. परंतु दोन्ही प्रमुख पक्षांची आघाडी आणि युती तुटल्याने मागील निवडणुकांपेक्षा या निवडणुकांमध्ये महिला उमेदवारांची संख्या वाढल्याचे चित्र बघण्यास मिळत आहे.
राष्ट्रवादीच्या निवडणूक घोषणा पत्रात 33 टक्के महिला आरक्षण देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महिला आघाडी शिवाय राष्ट्रवादी युवती काँग्रेस नावाने एक विंग आहे. ज्याचे नेतृत्व शरद पवार यांची खासदार मुलगी सुप्रिया सुळे या करतात. राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसमधील आघाडी तुतल्यानंतर सगळ्या जागांवर निवडणूक लढवणा-या कॉँग्रेसतर्फे यावेळी 27 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.ज्यामध्ये पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा नातेवाईकांचा सामावेश देखील आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण (भोकर), माजी केंद्रीय गृहमंत्री
सुशील कुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती शिंदे (सोलापुर मध्य), महिला व बाल कल्याण मंत्री वर्षा गायकवाड (धारावी-मुंबई), आमदार यशोमती ठाकुर (तिवसा-अमरावती, निर्मला गावित (इगतपुरी) आणि ऐनी शेखर (कुलाबा-मुंबई) यांचा सामावेश आहे. कॉँग्रेसतर्फे माजी पर्यावरण मंत्री संजय देवतले यांच्या विरोधात त्यांची नातेवाईक आसावरी देवतले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ऐन निवडणूकांच्या तोंडावर देवतलेंनी कॉँग्रेसला रामराम करुन भाजपात प्रवेश केला होता. पक्षाच्या नवीन चेह-यांमध्ये मुंबई महिला कॉँग्रेस अध्यक्ष शीतल म्हात्रे यांना दहिसर आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांना मलाबार हिल या भागातुन उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूरमध्ये राष्ट्रवादीतर्फे प्रगती पाटील यांना पश्चिम नागपुरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर हिंगणामधून कुंदा राऊत यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.
महिला उमेदवार निवडणूक येण्याची शक्यता कमीच
2009 च्या विधानसभा निवडणूकीत एकुण 3559 उमेदवारांपैकी 211 महिला उमेदवार होत्या. त्यापैकी फक्त 11 महिला आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. तर 2004 मध्ये 12 आणि 1999 मध्ये 86 पैकी 12 महिला निवडून आल्या होत्या. मागील विधानसभा निवडणूकीत सर्वात अधिक 5 महिलांनी कॉँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती. तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या 2-2 महिला आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
पक्षात काम करणा-या महिलांना देखील संधी
भाजपची महिला उमेदवारांमध्ये दिवंगत भाजप नेता गोपीनाथ मुंडे यांची मुलगी पंकजा मुंडे (परळी), माधुरी मिसाळ (पर्वती-पुणे), मनीषा चौधरी (दहिसर-मुंबई), भारती लवेकर (वर्सोवा-मुंबई) यांचा सामावेश आहे. लवेकर या राष्ट्रवादीमधून बाहेर पडून भाजपमध्ये सामील झाल्या आहेत. नुकत्याच राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या मंदा म्हात्रे यांना देखील पक्षातर्फे नवी मुंबईतील बेलापुर मतदर संघातुन उमेदवारी देण्यात आली आहे. क़ॉँग्रेस आणि भाजप पक्षातर्फे स्वत:च्या नातेवाईकांना तिकिट देण्याबरोबरच पक्षासोबत काम करणा-या जुन्या महिलांना देखील संधी देण्यात आली आहे.
महिला समोरा-समोर
ब-याच ठिकाणी प्रमुख पक्षांच्या महिला उमेदवार एकमेकांच्या समोर आल्या आहेत. माजी महिला व बाल कल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या विरोधात भाजपने दिव्या ढोले यांना मैदानात उतरवले आहे. तर अमरवती जिल्ह्यातील तिवसामधून कॉँग्रेसच्या यशोमती ठाकुर यांचा सामना भाजपच्या निवेदिता चौधरी यांच्या सोबत होणार आहे.
सोलापुरमधून कॉँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या समोर भाजपतर्फे मोहिनी पत्की यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दहिसर मुंबईमधून क़ॉँग्रेस, भाजप आणि मनसे यांच्यातर्फे शिवसेनेच्या सध्याच्या आमदार विनोद घोसाळकर यांच्या विरोधात महिला उमेदवार शीतल म्हात्रे (कॉँग्रेस), शुभा राऊल (मनसे) आणि मनीषा चौधरी (भाजप) यांना मैदानात उतरवेले आहे.
केजमध्ये महिलांमध्ये चुरशीची लढत
बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदार संघात महिलांमध्ये लढत होणार आहे. येथे सर्वच प्रमुख पक्षांनी महिला उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे. येथील मुख्य सामना भाजपच्या संगीता ठोंबरे, राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडा, शिवसेनेच्या कल्पना नरहिरे आणि कॉँग्रेसच्या अंजली घाडगे यांच्यात होणार आहे. नमिता मुंदडा माजी मंत्री विमलाताई मुंदडा यांच्या सुनबाई आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा काही उमेदवारांचे फोटो...