आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिंगण: आता मतदारांची ‘ईईटी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवड मंडळाच्या निर्णयानुसार माननीय रा. रा. संपत साहेबांनी मागील आठवड्यात निवडणूक पूर्व कँडिडेट एलिजिबिलिटी टेस्ट (सीईटी) घेतली. मात्र त्यानंतर राज्यात बरीच उलथापालथ झाली. महायुती तुटली, आघाडी फुटली आणि उमेदवारांचे भरघोस पीक राज्यात आले. यात मतदारांचा गोंधळ उडू नये यासाठी तसेच बदलत्या राजकीय घडामोडी मतदाराला माहिती व्हाव्यात यासाठी आता मतदारांची ‘इलेक्शन एलिजिबिलिटी टेस्ट’ अर्थात ‘ईईटी’ घेण्याचे ठरले आहे.

निवडमंडळ परीक्षा : २०१४
विषय: राजकीय ‘बदलत्या’ घडामोडी गुण १४४

प्रश्न : स्थानमाहात्म्य स्पष्ट करा :
१)कृष्णकुंज २) मातोश्री , ३) वर्षा , ४) बारामती , ५) नागपूर, ६) भोकर- नांदेड , ७) येवला-नाशिक, ८) भुसावळ, ९) लवासा, १०) रेसकोर्स मैदान

प्रश्न: व्यक्तिविशेष : सखोल माहिती लिहा :
अ)समाजभूषण महादेवबप्पा ब) ‘टिपरू’कार शेट्टीअण्णा क) संग्रामकार मेटेदादा ड) नाथा भुसावळकर ई) युवाबाण अादित्य फ) नवसंघर्षकर्ती पंकजाताई

प्रश्न: संदर्भासहित स्पष्टीकरण द्या :
१)‘मुख्यमंत्रीबनूनच दाखवतो’ २) ‘सर्वजण स्वत:चा विचार करताहेत, आपण महाराष्ट्राचा विचार करू’ ३) ‘हा तर शेपटी तुटलेला लांडगा’ ४)‘आम्हाला तिष्ठत ठेवले’ ५)‘भाजपने पाठीत खंजीर खुपसला’

प्रश्न: एका वाक्यात उत्तरे द्या :
१)महायुती तुटीचा खरा खलनायक कोण ?
२) मित्रपक्ष कोठे पळाले ?
३)आघाडीचे बिघाडीकार कोण ?
४) ब्ल्यू प्रिंटचे जनक कोण ?
५) टॅब कोणाला मिळणार आहेत ?
६) मुख्यमंत्री कोण कोण होणार आहेत ?
७)काँग्रेसमधून इतर पक्षांत किती जण गेले ?
८) राहुल गांधी सध्या नेमके कोठे आहेत ?
९) अमिताभाभींना बी फॉर्म कोणी दिला ?
१०) काव्याचार्यांना सत्तेत किती टक्के वाटा मिळणार आहे ?

प्रश्न: निबंध लिहा.
१)जागावाटप : शाप की वरदान २) मी श्रेष्ठी झालो तर.. ३) कार्यकर्त्याचे मनोगत ४) आदर्श घोटाळा ५) मला मुख्यमंत्री व्हायचंय...

प्रश्न: सविस्तर उत्तरे लिहा ?
१)कोलांटउड्यांचे राजकारण
२) उमेदवारी मिळवण्याचे कौशल्य
३) युती-आघाडी-मैत्री तोडण्याची पाच कारणे
४) व्हिजन डॉक्युमेंट ब्ल्यू प्रिंट
५) भाउबंदकीचे राजकारण

-रिंगमास्टर