आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Polls. Shivsena Bjp Alliance Issue At Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंता: महायुती-आघाडीतील उमेदवारांची मुंबईच्या वार्‍यांनीच होतेय दमछाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शिवसेना-भाजपमहायुती आणि सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागा वाटपाचा तिढा पाचव्या दिवशीही कायम असल्याने इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. स्वपक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास लगेचच समोरच्या पक्षाकडे उडी मारण्याची तयारी असून ऐनवेळी निर्णय झाल्यास बहुतांशी इच्छुकांच्या मनात ही संधी हातची जाण्याची भीती आहे. त्यासाठी वारंवार मुंबई गाठावी लागत असल्याने राजधानीच्या वाऱ्यांमध्येच त्याची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

पितृपक्षामुळे अर्ज दाखल करण्यास कोणी धजावत नसले, तरी आता त्याची सांगताही झाली आहे. तरीही युती, आघाडीचे गुर्‍हाळ सुरूच असल्याने उमेदवारांचा संयम सुटत चालला आहे. ज्यांना खात्री आहे, त्यांनी परस्पर अर्ज दाखल करण्याचा मुहूर्तही काढून घेतला आहे. पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एबी फॉर्म शेवटच्या दिवशी सादर करण्याची तयारी दर्शवित इतर तयारी करण्यात आली आहे.
अनेकांचा मुहूर्त शुक्रवारचा
शहरातील चारही मतदारसंघांसह ग्रामीणच्या मतदारसंघातील विद्यमान आमदारांनी शुक्रवारचा मुहूर्तही काढला आहे. त्यापाठोपाठ त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरू पाहणाऱ्या इच्छुकांनी त्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करून आव्हान देण्याची रणनिती आखली आहे. इच्छुकांची संख्या सर्वाधिक असलेल्या सेना-भाजपमध्ये तिकिटासाठी परकोटीची स्पर्धा असून त्यातील काहींनी बंडाचा झेंडा फडकविण्याचीही तयारी केल्याचे जाणवते.