आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Polls, Candidate CET News In Marathi

रिंगण: उमेदवारांची ‘सीईटी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवड मंडळाच्या निर्णयानुसार माननीय रा. रा. संपत साहेबांनी यंदापासून निवडणूक पूर्व ‘कॅन्डिडेट एलिजीबिलिटी टेस्ट’ (सीईटी) घेण्याचे ठरवले आहे. ही उमेदवारीसाठी पात्रता परीक्षा असून यंदापासून निगेटिव्ह मार्किंग पद्धती लागू करण्यात आली असल्याने अंदाजबहाद्दरांना धक्का बसला आहे.
निवड मंडळ परीक्षा : २०१४
विषय : राजकीय चालू घडामोडी (गुण २८८)

प्रश्न १ : योग्य जोड्या लावा
१) सिंचन घोटाळा अ) सेनेचे धाकले महाराज
२) आदर्श प्रकरण ब) सा. बां. सरदार छगनभाऊ
३) शिवबंधन क) धरणमित्र दादा
४) मफलर ड) कृष्णकुंजनिवासी राजा
५) ब्ल्यू प्रिंट इ) विकासपर्वकार नांदेडकर

प्रश्न २ : टिपा लिहा
अ) खळ्ळ खट्याक् ब) टोलनाके क) महायुतीचे जागावाटप ड) आघाडीचे राजकारण ई) शीघ्रकवींच्या चारोळ्या

प्रश्न ३ : संदर्भासहित स्पष्टीकरण द्या :
१) आता माझी सटकली ३) आता माझी बारी ४) अशा लाटा येतच असतात ५) सन्मान आणि समाधान ६) आम्ही दोन पावले टाकली

प्रश्न ४ : निवंध लिहा.
१) धरणे बोलू लागली तर.. २) काकांचे मनोगत ३) आदर्श नेता ४) पुतण्या - शाप की वरदान ५ ) निवडणुकीनंतरचा महाराष्ट्र

प्रश्न ५ : एका वाक्यात उत्तरे द्या
१) सिंचन घोटाळा कोणत्या राज्यात झाला ?
२) बोटावरची शाई पुसून किती वेळा मतदान करता येते ?
३) तेलगी कोण होता ?
४) उड्डाणपुलांचे जनक कोण ?
५) टाळी किती हातांनी वाजते ?
६) भूखंडाचे श्रीखंड कोणी खाल्ले ?
७) आदर्श वसाहत कोठे आहे ?
८) शिववडा कोठे मिळतो ?
९) घरकुल घोटाळा कोणत्या जिल्ह्यात झाला ?
१०) कराडमधून कोण लढणार आहे ?

प्रश्न ६ : सविस्तर उत्तरे लिहा.
१) दुष्काळ निवारणांचे दादांचे सूत्र २) घड्याळ व हात संबंधावर चर्चा करा. ३) इंजिनाची रचना, दिशा व सद्य:स्थिती स्पष्ट करा ४)अपक्ष व त्यांचे महत्त्व, उपयोग उदाहरणांसह सांगा. ५) टोलनाक्यावरील राजकारण

-रिंग मास्टर