आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Polls News In Marathi. Famous Faces In Politics Election 2014

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानसभा निवडणुकीचे काउंटडाऊन सुरु, पाहा चर्चेतील राजकीय चेहरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून 15 ऑक्टोबरला मतदान आहे. उमदेवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख दोन दिवसांवर येऊन ठेवली असतानाही शिवसेना-भाजप महायुती आणि काँग्रेस- राष्ट्रवादीमधील आघाडी यांच्यात जागावाटपावरून धुमशान सुरूच आहे.
जागावाटपाच्या गुर्‍हाळादरम्यान अनेक राजकीय चेहरे चर्चेत आले आहेत.

शिवसेना आणि भाजपच्या जागावाटपावरून घटक पक्षांची चांगलीच गोची झाली आहे. जागावाटपाचा लवकर निर्णय घ्या, अन्यथा आम्हीही स्वबळावर लढू, असा अल्टीमेटमही घटक पक्षांच्या नेत्यांनी ‍दिला आहे. शिवसेना- भाजपची युती तुटली तर कोणासोबत जायचे, असा प्रश्नही घटक पक्षासमोर उभा ठाकला आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसची निम्या 144 जागांची आग्रही भूमिका अजूनही कायम आहेत.या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचा 124 जागांचा प्रस्तावही राष्ट्रवादीने फेटाळला आहे. जागावाटपाचा हा पेच सोडविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांच्या राज्यातील प्रमुख नेत्यांच्या आतापर्यंत अनेक बैठका झाल्या, मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
एकूणात जागावाटपाचे गुर्‍हाळ, त्यात पक्षांतराचे पिक आल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेतील चेहरे...