आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Polls Sanjay Sawakare News In Marathi,

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

..तर शिवसेनेचा प्रचार करेन- संजय सावकारे, भुसावळात भाजपविरोधात राळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- भुसावळ विधानसभा मतदारसंघातून गतवेळी राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या संजय सावकारेंनी सोमवारी मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला. मंगळवारी सकाळी महानगरी एक्स्प्रेसने त्यांचे शहरात आगमन झाले. स्थानकावर राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा परिषद सदस्य समाधान पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी, भाजपचे शहराध्यक्ष रमण भोळे, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी, नगरसेवक प्रमोद नेमाडे, वसंत पाटील, आयटीसेलचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, शेख पापा शेख कालू, उदयसिंग काके, परीक्षित बऱ्हाटे आदींसह भाजप आणि सावकारेंचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेशानंतर झालेल्या या स्वागत सोहळ्याकडे भाजपचे अनिल चौधरी, नगरसेवक अजय भोळे, अजय पाटील यासह भाजपचे जुन्या पदाधिकाऱ्यांनीदेखील पाठ फिरवली. यामुळे शहर भाजपमध्ये सरळ-सरळ दोन गट असल्याचे प्रथमदर्शनी चित्र होते.
शिवसेनेने उठवली भाजपविरोधात राळ
पालकमंत्री संजय सावकारे यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे भुसावळात शिवसेनेची जागा भाजपला सुटेल या धसक्यातून भुसावळमधील शिवसैनिकांनी भाजपविरोधात राळ उठवली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेची हक्काची जागा भाजपला सोडू नये, असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. दरम्यान, भाजपत प्रवेश केल्यानंतर सावकारे प्रथमच मंगळवारी भुसावळात दाखल झाले. त्या वेळी रेल्वेस्थानकावर त्यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. याप्रसंगी सावकारे यांना छेडले असता ते म्हणाले, तिकीट मिळण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला नसून भुसावळ येथून शिवसेनेला उमेदवारी मिळाल्यास आपण शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करू. सावकारे यांच्या या वक्तव्यामुळे भुसावळची जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार, याबाबत तर्क-वितर्क करण्यात येत आहे.

तिकिटासाठी भाजपत प्रवेश केला नाही
तिकीट मिळण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी पक्षांतर्गत हितशत्रूंना बळ दिल्याने पक्ष बदलाचा निर्णय घेतला आहे. भुसावळ मतदारसंघात शिवसेनेला उमेदवारी मिळाल्यास आपण त्या उमेदवाराचा प्रचार करू.
- संजय सावकारे, माजी पालकमंत्री