आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Polls, Shiv Sena And BJP Dispute , Election2014

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपने धुडकावला शिवसेनेचा अंतिम प्रस्ताव, चर्चा करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिलेला अंतिम प्रस्तावही भाजपने फेटाळून लावला आहे. ‘युती टिकावी अशी आमचीही इच्छा आहे. मात्र माध्यमांतून जागा वाटपाचे प्रस्ताव देणे योग्य नाही. चर्चेतून मार्ग काढायला हवा,’ असे प्रत्युत्तर भाजपचे नेते एकनाथ खडसे व विनोद तावडे यांनी उद्धव ठाकरेंना दिले. तसेच युतीत कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेच्या मेळाव्यानंतर भाजप नेत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. ‘आम्ही यापूर्वीच शिवसेनेकडे १३० जागांची मागणी केली आहे, त्यावर आजही ठाम आहोत. शिवसेनेने १४० जागा लढवाव्यात उर्वरित १८ जागा मित्रपक्षांना द्याव्यात, असा आमचा प्रस्ताव आहे.’, असे तावडे म्हणाले

खडसे म्हणाले की, ‘युती झाली तेव्हा लोकसभेच्या ३२ भाजपकडे तर १६ जागा शिवसेनेकडे होत्या. मात्र आम्ही शिवसेनेला सहा जागा वाढवून दिल्या. तसेच प्रकाश जावडेकरांची राज्यसभेची जागाही रिपाइंला दिली. मात्र या बदल्यात शिवसेनेने आम्हाला विधानसभेची एकही जागा वाढवून दिली नाही. युती टीकावी यासाठीच आम्ही आजपर्यंत माघार घेत आलो आहोत. मात्र आता राजकीय परिस्थिती बदलल्याने जादा जागा मिळाव्यात, अशीच आमची अपेक्षा आहे. नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत. त्यांच्यावर टीका होत असेल तर ती सहन केली जाणार नाही,’ अशा शब्दात खडसे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले.
चार दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी ‘आम्ही मुंबईत राहतो, आजवर अशा अनेक लाटा पाहिल्या आहेत,’ असा टोला मोदींचे नाव न घेता लगावला होता.

५९-१९ चा वाद
युती झाल्यापासून राज्यातील ५९ मतदारसंघात शिवसेना व १९ मतदारसंघात भाजप कधीच विजय मिळवू शकलेला नाही. या जागांच्या अदलाबदलीचा विचार व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे, या मागणीचा पुनरुच्चार खडसे व तावडेंनी केला. ज्याचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री, हेच सूत्र आजही कायम असल्याचे ते म्हणाले.