आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Polls, Shiv Sena Leader Ramdas Kadam News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता भाजपच्या नेत्यांनी खो घालू नये : रामदास कदम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला गाडण्याची जनतेची इच्छा आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यात खो घालू नये आणि २५ वर्षापासूनची युती शाबूत ठेवावी. त्यांनी तुटेपर्यंत ताणू नये, असे आवाहन शिवसेना नेते रामदास कदम यांनी रविवारी येथे केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंडे आणि लालकृष्ण अडवाणी यांनी २५ वर्षापूर्वी झालेल्या फॉर्मुल्यानुसार राज्यात भाजप-सेना युती आहे. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या कोट्यातून मित्रपक्षांना १८ जागा देण्याची भूमिका घेतली. आता भाजपने फार ताणू नये. शेवट गोड होईल. २५ वर्षापासूनची आमची मैत्री तुटणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही मित्रपक्षांसाठी १८ जागा सोडल्याने भाजपच्या ११९ जागा शाबूत राहिल्या आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांचे समाधान होईल. महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपच्या नेत्यांनी युती अभेद्य ठेवावी असे त्यांनी सांगितले. घोटाळे करून राज्याला लुटणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गाडण्यासाठी युती टिकावी अशी प्रार्थना करण्यासाठीच आपण शिर्डीत आलो असल्याचे ते म्हणाले.