आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Polls Shivsena And BJP Divorce News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

25 वर्षांची मैत्री तुटली, घटस्थापनेला शिवसेना-भाजपचा अखेर घटस्फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेना- भाजपची 25 वर्षांपासूनची मैत्री गुरुवारी सायंकाळी अखेर तुटली. भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषदेत घेऊन ही माहिती दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे ज्येष्‍ठ नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने सेना आणि भाजपची 1989 मध्ये युती अस्तित्वात आली होती. अखेर 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सेना-भाजपने घटस्फोट घेतला. आता याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो, हे बघण्यासारखे आहे.

शिवसेना - भाजपची युती संपुष्टात आल्याची माहीती भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी खडसे म्हणाले, की भाजपला मुख्यमंत्रीपद हवे असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. शिवसेनेने भाजपचे समाधान न होऊ शकणारे प्रस्ताव ठेवले होते. आम्ही 119 जागा आधीपासून लढवत होतो. परंतु, शिवसेनेकडून अवास्तव प्रस्ताव पाठवण्यात येत होते. त्यामुळे कधी आमच्या जागा कमी होत होत्या तर कधी घटकपक्षांच्या. त्यामुळे अखेर आम्ही विधानसभेपुरती युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
खडसे पुढे म्हणाले, की असे प्रस्ताव येत असताना आता काय करायचे असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कार्यकर्ते विचारत होते.
पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आमदार पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि महादेव जानकर उपस्थित होते.

दरम्यान, शिवसेना - भाजपमध्ये जागावाटपाचा गुंता सोडवण्यासाठी अनेकदा चर्चा झाल्या. परंतु या चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही. अखेर दोन्ही पक्षांच्या चर्चेचा शेवट काडीमोडीनेच झाला.

दुसरीकडे, भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती असल्याचा आरोप शिवसेनेचे अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळेच राष्‍ट्रवादीने आपली पत्रकार परिषद टाळल्याचेही अडसूळ यांनी सांगितले.
पुढील स्लाईडवर वाचा, काय म्हणाले, देवेंद्र फडणवीस....