आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State Election 2014, News In Marathi

रिंगण: जागावाटपाच्या गुर्‍हाळाचा घमघमाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कणखर देशा, राकट देशा, नेत्यांच्या देशा, पुढार्‍यांच्या, हुजर्‍यांच्या अन् कार्यकर्त्यांच्या देशात आता निवडणुकांचे, काही जणांसाठी मतलबी, तर काहींसाठी ‘मलई’चे वारे वाहू लागले आहेत.

जागावाटपाच्या गुर्‍हाळाचा घमघमाट
महायुती, आघाडीच्या शिवारातून घुमू लागला आहे. शह-काटशहाच्या, दबावाच्या उकळीने गुर्‍हाळाच्या काकवीचा गोडवा कडूसर होतो आहे. २५ वर्षांपासूनचे दोस्त ‘ही दोस्ती तुटायची नाय’ म्हणत बाह्या सावरू लागले आहेत. राजमान्य राजेश्री फोटोग्राफर भूषण, शिवबंधनकार श्रीयुत धाकले महाराज सेनेच्या बुरुजावरून समुद्रातल्या लाटा पाहण्यात मग्न आहेत.

तेवढ्यात त्यांचे दिल्लीचे रोखठोक फेम लेखणीबहाद्दर सरदार चिंतित चेहऱ्याने बुरुजावर दाखल झाले...
धाकल्या महाराजांना लेखणीबहाद्दरांनी अत्यंत नम्रपणे मुजरा केला एकवार आपल्या आडव्या केसांवर हात फिरवत ते ळखाकरले. लाटा पाहण्यात मग्न असलेल्या धाकल्या महाराजांनी आपल्या डोळ्यांची लेन्स सरदारांवर रोखली शक्य तेवढा खडा आवाज काढीत त्यांनी विचारलं...
‘बोला, लेखणीबहाद्दर काय खबर ?
‘प्रसंग बडा बाका आहे महाराज.’
‘झाले काय ?’
‘राज्यात आचारसंहिता लागली तरी जागावाटपाचे घोडे पुढे सरकेना झालेय.’
‘अरे, त्यात काय एवढं. २५ वर्षांपूर्वी आमच्या पिताश्रींनी त्याचं सूत्र आखून दिलंय, त्याचं काय ?’
‘तसं नाही महाराज, मोदी लाटेने चिखलगावचे सारे सरदार फॉर्मात आहेत.’
‘अरे, अशा कित्येक लाटा आम्ही रोज पाहतो या बुरुजावरून, काय मागणे आहे?’
‘१३५
‘सूत्रापेक्षा १८ ने भाव वाढवला काय?’
‘होय महाराज...’
‘काय समजतात काय हे स्वत:ला, आमचे पिताश्री होते तेव्हा एकाची हिंमत नव्हती तोंडातून ब्र काढायची..
‘मी अग्रलेखातूनही बाण मारून पाहिले.’
‘तुमच्या कागदी बाणांचं कौतुक ठेवा तुमच्याकडेच, जरा ताणा आणखी. तो गुजरातचा बाबा केव्हा येणार आहे?’
‘कोण, शहाबाबा का ?’
‘पुरंदरला वेढा पडला होता. स्वराज्य धोक्यात आले होते तेव्हा महाराजांनी तह केला होता. आपलाच राजपूत
सरदार
जयसिंहाशी. लक्षात आहे का?’
‘मी कसा विसरेन महाराज?’
‘तर मग माझ्याकडे पाहता काय, शहाबाबाशी तहाची तयारी करा.’
‘.. पण महाराज आपल्या मिशन १५० चे काय ?’
‘सांगतो तेवढे करा.’
‘...जशी आज्ञा महाराज.’
धाकले महाराज प्रेस कॉन्फरन्समध्ये उत्तरे देताहेत... ‘१३५ जागा कधीच सोडणार नाही. मैं युती के खिलाफ नहीं
हूं. सब
पर्याय ओपन है. मैं और वातावरण खराब नहीं करना चाहता...!’
-रिंगमास्टर