आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State Legislative Assembly Speaker Election Controversy

स्थिती जैसे थे: सेना आमदारांना उद्या विधानसभेत उपस्थितीचे आदेश, उद्धव यांच्या निर्णयाकडे लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजप सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली सेना आमदारांची बैठक संपली आहे. 'शिवालय' येथे जवळपास तासभर चाललेल्या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला याकडे सगळ्याची लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या या बैठकीला सर्व नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. भाजपला पाठिंबा द्यायचा की, विरोधीपक्षात बसायचे याचा निर्णया सस्पेन्स अद्याप कायम आहे. शिवसेनेने भाजपला बुधवारी सकाळपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.
शिवसेनेच्या सर्व आमदारांसाठी एक व्हिप जारी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
सेनेच्या सर्व आमदारांना बुधवारी सकाळी 9 वाजता विधानभवनात उपस्थित राहाण्याचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. विधानसभा ‍सभापतींची बुधवारी सकाळी निवडणूक घेण्यात येणार आहे.

दरम्यान, भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी भाजपचा विश्वासदर्शक ठराव संमत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षाचा पाठिंबा आम्हाला मान्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विरोधीपक्षनेतेपदावरही शिवसेना दावा सांगणार असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर आज (मंगळवार) विधानसभा अध्यक्षपदासाठीही त्यांनी पारनेरचे आमदार विजय औटी यांचा अर्ज दाखल केला. त्यामुळे एकीकडे भाजपसोबत सत्तेत सहभागाची चर्चा सुरु असतानाच शिवसेना संमातर राजकारण करत आहे.

मुख्यमंत्री शिवसेना नेत्यांशी चर्चा करणार
विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना नेत्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्वतः सांगितल्याचा दावा एका मराठी वृत्तवाहिनीने केला आहे. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.

आज दुपारी तीन पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ होती. भाजपकडून औरंगाबादमधील फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे, शिवसेनेकडून विजय औटी आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे. बुधवारी सकाळी 10 पर्यंत अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत आहे.

पुढील स्लाइडमध्ये, शिवसेनेशिवाय भाजप जिंकणार विश्वासदर्शक ठराव