स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्र म्हणजेच राजकारण आणि राजकारण म्हणजेच महाराष्ट्र असे समिकरण राहिले आहे. शिवाजी महाराज असो, पेशवे असो किंवा औरंगजेब अवघ्या भारताची सूत्रे महाराष्ट्रातून हलत असे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही महाराष्ट्राला एकसंध राहण्यासाठी आणि वेगळ्या अस्तित्वासाठी झगडावे लागले आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत महाराष्ट्राच्या भूमित जन्मायला आलेल्या प्रांतिक पक्षांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांनी राज्याचे राजकारण ढवळून काढले आहे. या राज्याच्या राजकीय पटलावर
आपली मुद्रा उमटवली आहे. जाणून घेऊयात या तीन प्रमुख प्रांतिक पक्षांबद्दल...
महाराष्ट्रात पुढील महिन्यात (15 ऑक्टोबर) रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. मागील काही दिवसापांसुन सेना-भाजप आणि आघाडी यांच्यामध्ये जागा वाटपावरुन मोठ्या प्रमाणात राजकारण सुरु आहे. काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणूकांमध्ये मोदी लाट होती. त्यानुसार केंद्रामध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले. गेल्या 15 वर्षांपासून महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आहे. परंतु केंद्राप्रमाणे राज्यातही जनतेला बदल हवा आहे, असे दिसून येत आहे. तशी वातावरण निर्मीती देखील करण्यात येत आहे. पण जगावाटपांचा घोळ संपत नसल्याने मतदारांच्या डोक्यात नेमके काय शिजत आहे आणि राजकीय नेत्यांना नेमके काय करायचे आहे हे आणखी स्पष्ट नसल्याने विधानसभेच्या निवडणूकीचा निकाल कसा लागणार याकडे सर्वाचे लक्ष असणार हे नक्की.
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष महत्त्वाचे असल्याने जनता कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला संधी देणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. या सर्व घडामोडीचा विचार करत नेमके महाराष्ट्रातील या तीन अतिशय महत्त्वाच्या पक्षांची निर्मीती कशी झाली? त्यांचा इतिहास काय आहे हे माहिती होण्यासाठी आम्ही निवडणूकांच्या पार्श्वभुमिवर ही माहिती तुम्हाला देत आहोत.