आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगण - नमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदिनमोनी गणरायाला, देवी भवानीला,
मुजरे करतो उदार मतदार राजाला,
गाइले पवाडे आजवर कैकांनी,
ऐका आता निवडणुकांची कहाणी ।। 1।।

महाराष्ट्री दिवाळी आधी रंगणार आश्वासनांची होळी,
जागावाटपात जो,तो भाजू पाहतोय आपापली पोळी,
जशी करणी तशी भरणी,
कोणी मफरलची ऊब घेई, कोणी हाती कमळ घेई ।।2।।

आयारामांच्या खतानं फुलतेय कमळाची शेती,
धनुष्यबाणाच्या भात्यात हुकमी अस्त्रांच्या पाती,
मोदी लाटेने गळपटले माणिकरावांचे मोती,
घडाळ्याच्या गोटात जमली सारी नाती-गोती ।।3।।

आबा, दादा, बाबा सारे लागले कामाला,
शिवबंधनाचे धागे जो,तो बांधी हाताला,
कृष्णकुंजी वेग आला ब्ल्यू प्रिंट छापायला,
घडाळ्यांच्या काट्यांनी थरथर सुटली हाताला ।। 4।।

हाताची घडी तोंडावर बोट, जो तो काढी दुसºयात खोट,
कमळाबाईची खुशी निराळी, खुणवू लागला सत्तेचा पाट,
तिसºया आघाडीची नेहमीप्रमाणे ठरणार का वाट,
रामदासी कवितांचा दुसरीकडे वेगळाच थाट ।। 5।।

अबकी बार, अबकी बार गुंजणार,
तोच ‘बार’, चकणा फार, चर्चा रंगणार,
तो त्याचा, हा माझा, घोळ चालणार
दिवाळीच्या आधी सत्तेचा फराळ चाखणार ।।6।।

ताई, माई, अाक्का विचार होऊ द्या पक्का
लबाडांना यंदा देणार का हो धक्का
पाच वर्षांनी एकदाच येतो हा मोका
सामान्य माणूस असतो हुकुमाचा एक्का ।। 7।।

सर्वांच्या मागे आता आचारसंहितेची पीडा,
पितृपक्षात सुटणार का जागावाटपाचा गाडा
सभा-मेळाव्यांनी गाजणार महाराष्ट्राचे अंगण,
तुमच्या साथीला राहील आता हे रिंगण ।।8।।
-रिंगमास्टर