आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Vidhansabha Election 2014 Seat Distribution

रिंगण - जागावाटपाचं गुऱ्हाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मा. रा. रा. संपत साहेबांनी दिल्ली मुक्कामी निवडणुकांची घोषणा केली. दिवाळी आधीच राज्यात प्रचारांचे फटाके फुटणार आहेत. या घोषणेने ऐन पितृपक्षात महाराष्ट्रात राजकीय चैतन्य पसरले. महायुती, आघाडीत जागावाटपांचा घोळ नेहमीप्रमाणे सुरू झाला. महायुतीचे आता दोनाचे पाच झाल्याने घोळ आणखी वाढला. भाजप, सेनेने एकमेकांवर दबावतंत्र सुरू केले. दिल्लीत सत्ता आल्याने भाजप सध्या फार्मात आहे. राज्यावर लक्ष असलेल्या भाऊंचे (पक्षी : रा.रा. नितीन भौ नागपूरकर) दूत २४ बाय ७ भाऊंना अपडेट देत आहेत.
दिल्लीच्या सारीपाटाचा खेळ सावरणाऱ्या भाऊंचा मोबाइल खणखणला.
भाऊंनी आपल्या जाडसर बोटाने स्क्रीन स्वाइप केली, आणि बोलले ...
‘बोल बे भैताड्या, मी कवाचा वाट पाहून राहिलो तुह्यावाल्या फोनची’
‘भौ, तुम्हालेच फोन लावीत होतो, पर लाइनच एंगेज येत व्हती’
‘मुद्द्याचे बोल बे, आज नाष्टाले काय हाय बे’
‘काय भौ?’
‘तुला नाय बे, तू बोल’
‘भौ ते दादू लय ताणत्याती इकडं, सामन्यातनं बाण मारतायेत.तिकडं शेट्टी अण्णा बी लयच चढून बसल्याती’
‘तूमी ते लेकाहो, दुसऱ्याचंच सांगून राहिले, आकडा बोल ना बे, अरे हे सामोसे कुठून आणले बे, गरम नाहीते.’
‘काय भौ?’
‘तुला नाय बे... तू बोल’
‘तुमचं मन दिल्लीत नाय लागत अशी चर्चा हाय इकडं’
‘कशावरून बे. कोठून बी काय बी तर्क काढतात लेकाचे. तू लक्ष देऊ नको त्यावाल्याकडं. आयत्या वक्ताले करू काय ते.’
‘पर लय कडक बाण सुटल्याती इकडं, म्हणून मणंल घालावं भौनंच्या कानावर’
‘लय शानपण नगं शिकवू, जागांचं काय झालं ते बोल बे. तुला ते जागांवर लक्ष ठेवाले सांगितलं का माह्या मनावर बे’
‘तसं नाय भौ बर लयच चर्चा रंगलीया, रामदासभाऊंनी तं चारोळ्यातनं जागा मागणं सुरू केलंय ’
‘काय म्हणाताय ते शीघ्रकवी ’
‘किमान १५ तं सोडा म्हणतेत.’
‘अमितशाचं भ्या दाखावा नं त्येनला’
‘अमितशा तं सारं कोड्यातच बोलून राहिले नं भाऊ’.
.... मोठा पॉझ... दूतालाही कळेना काय झाले ते...तेवढ्यात भाऊंचा आवाज आला...
‘तेच तं कोडं पडलंय मले बी’.....
‘जागावाटपाच्या गुर्हाळाचं अपटेड दे मले वरचेवर, आता फोन ठेव बे, लय टाइमपास नको, सामोसे वाट पाहताहेत माह्यावाली.’

-रिंग मास्टर