आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महायुतीच्या घटक पक्षांची घसरण; खासदार राजू शेट्टी यांची स्पष्टोक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दोनमहिन्यांपूर्वी १०० पेक्षा अधिक जागा मागणाऱ्या महायुतीमधील घटक पक्षांना जागावाटपाचा फटका बसला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या वादामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी आणि शविसंग्राम या चारही पक्षांना केवळ १८ च्या आत जागा मिळणार हे स्पष्ट झाले आहे. समन्वयाची भूमिका घेतल्यामुळे हा फटका बसला असून सर्वाधिक नुकसान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे झाले असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगतिले.
लोकसभेत महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यानंतर घटक पक्षांना विधानसभेत जास्तीत जागा मिळतील अशी आशा वाटत होती. त्यानंतर दोन्ही पक्षांनी त्या पद्धतीने मागण्या मांडण्यास सुरुवातदेखील केली होती. मात्र, गेल्या आठवडाभरात युतीमध्ये झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे घटक पक्षांच्या मागण्या बाजूला पडल्या आहेत.
दोनमहिन्यांपासून दबाव : लोकसभेच्या निकालानंतर जुलै आणि ऑगस्टपासून महायुतीमधल्या घटक पक्षांनी त्यांच्या मागण्या मांडण्यास सुरुवात केली. यामध्ये राजू शेट्टी यांनी २६ जुलैच्या कोल्हापूरमधल्या कार्यकर्ता मेळाव्यात ४० जागांची मागणी केली. त्यानंतर अकरा ऑगस्टला अमरावतीत पत्रकार परिषद घेत ३८ जागांची मागणी केली. मात्र, चर्चेला प्रतिसाद मिळत नाही हे पाहून १३ जागांची मागणीही करत जागा मिळाल्यास बाहेर पडण्याचा इशाराही सदाभाऊ खोत यांनी औरंगाबादमध्ये दिला होता. रिपाइंनेदेखील २७ जुलैला औरंगाबादच्या मेळाव्यात १५ टक्के वाटा सहा मंत्रिपदे देण्याची मागणी केली. त्यानंतर २८ ऑगस्टला दिल्लीत भाजप अध्यक्ष अमति शहा यांची भेट घेत केंद्रात मंत्रिपद, राज्यपालपद आणि १३ जागांची मागणी केली. राष्ट्रीय समाज पक्षाच्या जानकर यांनी ३५ तर विनायक मेटे यांनी दहा जागांची मागणी केली होती. मात्र सर्वांनाच आता नमते घ्यावे लागत आहे.
भांडणात राहिले केवळ चर्चेत
महायुती राहणार की फुटणार, या चर्चेत घटक पक्षांनीदेखील भाग घेतला. यामध्ये शेट्टी, आठवले, जानकर हे या चर्चेत दूत म्हणून काम करत आहेत. शविसेना-भाजपचे प्रस्ताव घेत अनेकदा "मातोश्री'देखील गाठली. या चर्चेत आम्ही कमी जागा घेतो, मात्र तुमचे भांडण आवरा अशी भूमिका या घटक पक्षाने घेतली.
शिवसेनेच्या अस्तति्वाचा प्रश्न
हीलढाई शविसेनेच्या अस्तति्वाची आहे. त्यामुळे हा वाद वाढत चालला आहे. त्यामुळे घटक पक्षांनादेखील त्याचा फटका बसणार आहे. मुळात शेट्टी, जानकर, आठवले आणि मेटे या सर्वांची विचारसरणी वेगळी असतानाही त्यांना मुंडेंनी एकत्रति आणले होते. त्यामुळे यांच्या जागा निवडून येण्याची शक्यता कमी असली तरी डॅमेजिंग फॅक्टर मोठा आहे. पण युतीच्या भांडणात त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
संजीव उन्हाळे, राजकीय विश्लेषक
स्वाभिमानी संघटनेचे नुकसान
आम्हीसमन्वयाची भूमिका बजावली. मात्र त्यामुळे आम्हाला कमी जागा मिळाल्या.आमचे उमेदवार नवीन आहेत. त्यामुळे प्रचाराला वेळ कमी मिळणार आहे. सर्वांना एकत्रति १८ जागा देण्याबाबत दोघांचेही एकमत आहे. त्यामुळे सर्वाधिक नुकसान आमचे होणार आहे. मात्र महायुतीची सत्ता यावी यासाठी ही तडजोड केली आहे.
राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना