आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमोहन आणि मोदींचे धोरण एकच; सदस्य सीताराम येचुरी यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मनमोहन आणि मोदी सरकारचे धोरण एकच आहे. मनमोहनसिंग यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदीसुध्दा परदेश दौरे करून परदेशी कंपन्यांसमोर पायघड्या घालण्याचे काम करत आहेत, असा आरोप माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य सीताराम येचुरी यांनी बुधवारी येथे केला.
सोलापूर मध्यमधून उभे असलेल्या नरसय्या आडम यांच्या प्रचारासाठी ते सोलापुरात आले होते. या वेळी झालेल्या सभेत ते म्हणाले, मनमोहन सरकारनेही कधी विकास केला नाही.
त्याचप्रमाणे मोदीसुद्धा काम करत आहेत. श्रीमंत लोकांना पाच लाख कोटी रुपयांचे कर माफ केले जात आहेत. हे धोरण पूर्वीसुद्धा होते आणि आताही आहे. त्यासाठी श्रीमंतांकडे पैसाच पैसा आणि गरिबांना जगण्यासाठीही पैसे नाहीत. मोदी सरकार शंभर दिवसात विकास केल्याचा दिंडोरा पिटत आहेत; परंतु प्रत्यक्षात शंभर दिवसांत काहीच विकास झाला नसून बेरोजगारी वाढली आहे, महागाई भरमसाट वाढत आहे, योजना बंद पडत आहेत, अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यासाठी या सरकारला माकप हाच पर्याय आहे. स्थानिक पातळीवर या सर्व समस्या सोडवण्यासाठी नरसय्या आडम हाच उत्तम पर्याय असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
भाजप धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हा देश फक्त हिंदूंचाच नसून मुस्लिम, शीख, ख्रिश्चन यांच्यासह सर्व जातीधर्मांचा आहे. बाबरी पाडून मुस्लिम आणि इतर समाजावर हल्ले करून भाजप समाजात तेढ निर्माण करत आहे. ते कधीच विकासाची भाषा करत नाहीत. विकास करायचा असेल जातीयता नष्ट करा, असा सल्लाही येचुरी यांनी या वेळी दिली.
सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांनी बुधवारी सीताराम येचुरी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.