आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Minister Balasaheb Thorat Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगर शहराच्या विकासासाठीच तांबे यांना उमेदवारी : मंत्री थोरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहराचा गेल्या २५ वर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सत्यजित तांबे यांच्यासारख्या तरुणाला पक्षाने संधी दिली, असे सांगत विकासासाठी त्यांना साथ देण्याची साद मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी नगरकरांना घातली.
शहरातील काँग्रेसचे उमेदवार तांबे यांच्या प्रचारासाठी दिल्ली दरवाजा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माळीवाडा, पंचपीर चावडी, नवीपेठ, चितळे रस्तामार्गे रॅली काढण्यात आली. युवा नेते सुजय विखे, काँग्रेसचे प्रभारी शहर जिल्हा अध्यक्ष दीप चव्हाण, विनायक देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. थोरात म्हणाले, तांबे तरुण असून त्यांना नगरबद्दल आस्था आहे. त्यांच्या निमित्ताने विकासाची संधी चालून आली आहे. गेल्या २५ वर्षांपासून शहर अधोगतीकडे गेले. तांबे यांची राहुल गांधी यांच्याशी जवळीक असून विकासात त्यांच्या या संबंधांचा मोठा फायदा होऊ शकतो.पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचा दावा दीप चव्हाण यांनी यावेळी केला. सर्व गट त्यांच्यासाठी एकत्रितपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.