आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Pradeep Jaiswal Latest News In Divya Marathi

सूचक-अनुमोदकावरून उमेदवारांमध्ये तारांबळ, शिरसाट, जैस्वाल यांचा अर्ज भरताना शिवसेनेचेच कार्यकर्ते हजर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवसेना-भाजपची महायुती तुटल्याचे सायंकाळी घोषित झाले, पण युतीबाबतचा वाद दुपारपर्यंत कायम असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना दोन्हीही पक्षाच्या उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली. कारण आतापर्यंत उमेदवाराच्या अर्जावर दोन्हीही पक्षाचे कार्यकर्ते सूचक व अनुमोदक म्हणून असत. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी जाणाऱ्या पाच जणांमध्ये तीन-दोन असे समीकरण असे. आज मात्र ते पूर्णपणे कोलमडले.
आजपर्यंत शिवसेनेचा उमेदवार अर्ज भरणार असेल तर सूचक किंवा अनुमोदक म्हणून भाजप नेता किंवा कार्यकर्त्याचे नाव असते. भाजपचा उमेदवार असेल तर वरीलप्रमाणेच होते. उमेदवारी अर्ज भरताना तीन दोन असे समीकरण असते. म्हणजे भाजपचा उमेदवार असेल तर अर्ज भरताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दालनात भाजपचे तीन तर सेनेचे दोन पदाधिकारी असतात. शिरसाट, जैस्वाल यांनी शहरातील दोन्ही मतदारसंघातून अर्ज सादर केले. यापूर्वीच्या युतीच्या रिवाजानुसार त्यांच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदकात भाजपचे कोणीतरी असले असते. परंतु तसे झाले नाही. सेनेचेच कार्यकर्ते सूचक-अनुमोदक होते. उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यासमवेत ही मंडळी होती. मात्र सूचक आणि अनुमोदक म्हणून आज शिवसैनिकच होते. जैस्वाल यांचा अर्ज भरताना खासदार चंद्रकांत खैरे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, माजी शहरप्रमुख जयंत ओक आणि महापौर कला ओझा हे चार जण सेनेचेच होते.

रात्री उशिरापर्यंत चालला गोंधळ
आतापर्यंत सेना तसेच भाजपच्या संभाव्य उमेदवारांनी शपथपत्रे तयार करून ठेवली होती. उमेदवारी अर्ज किरकोळ असल्यामुळे त्यासाठी जास्त वेळ लागत नाही. गुरुवारी अर्ज करण्याचे ठरल्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात झाली, तेव्हा मित्र पक्षाचे काय करायचे, असा प्रश्न समोर आला. उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज भरले. एकावर सूचक-अनुमोदक म्हणून फक्त शिवसैनिक, तर दुसऱ्यावर भाजपचे कार्यकर्ते होते.