(फोटो: मोहम्मद रफी यांचे पूत्र शाहिद आणि त्यांची पत्नी)
मुंबई- सुप्रसिद्ध दिवंगत गायक मोहम्मद रफी यांचे पुत्र शाहिद रफी हे एमआयएम पक्षातर्फे मुंबादेवी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत. एमआयएम अर्थात 'ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमन' हा खासदार असदउद्दीन ओवेसी यांचा पक्ष आहे. हैदराबादेत छाप सोडल्यानंतर एमआयएमने आता महाराष्ट्रात एंट्री केली आहे.
मुंबादेवी मतदार संघात शाहीद रफी, कॉंग्रेसचे अमीन पटेल आणि भाजपचे अतुल भातखलकर यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
शाहिद रफी यांचा गोरेगाव येथे कपड्यांचा व्यवसाय आहे. उल्लेखनिय म्हणजे शाहीद यांनी वडील मोहम्मद रफी यांच्या नावाने एक संस्था देखील सुरू केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून नवोदित गायकांना प्रशिक्षण दिले जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मोहम्मद रफी यांचे पुत्र शाहीद यांचे निवडक फोटो...