आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • MP Raju Shetty IN Mumbai For Meting With Sena Members

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महायुतीच्या चर्चेसाठी खासदार राजू शेट्टींच्या दिमतीला विशेष विमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - महायुती टिकवण्याच्या दृष्टीने शिवसेनेने एक पाऊल मागे घेतल्यानंतर मंगळवारी राजकीय हालचालींना वेग आला. त्यामुळेच कोल्हापुरात आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांना अंतिम चर्चेसाठी मुंबईला नेण्यासाठी चक्क खास विमानाची सोय करण्यात आली. दुपारी तीनला शेट्टी या विशेष विमानाने मुंबईला रवाना झाले.
महायुतीतील तिढा मिटत नसल्याने राजू शेट्टी यांच्यासह घटक पक्षातील छोट्या पक्षांचे नेते वैतागले होते. लवकर निर्णय घ्या, अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देऊन शेट्टी कोल्हापूरच्या दौऱ्यावर निघून आले होते. मात्र मंगळवारी चर्चा सकारात्मक पातळीवर आल्याने शिवसेना- भाजपला पुन्हा घटक पक्षांची आठवण आली. शेट्टी हे मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे आले होते. संध्याकाळच्या बैठकीसाठी त्यांना खास विमान पाठवून बोलावून घेण्यात आले. दुपारी तीनच्या सुमारास या विमानाने शेट्टी कोल्हापूरहून मुंबईला रवाना झाले. सत्तेच्या सारीपाटात छोट्या राजकीय पक्षालाही कसे महत्त्व येते याचेच हे द्योतक ठरले. ऊस दराच्या भांडणातून ज्या शेट्टी यांना बेदम मारहाण झाली होती त्यांना खास विमान पाठवणे, ही संघटनेची शक्ती आणि काळाचा महिमा !