आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहास बनवण्यास तयार आहे ही सुन, निवडणूक जिंकली तर बनेल सर्वात तरूण महिला आमदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिवंगत मंत्री विमल मूंदड़ा यांची सुन नमिता या केज विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहे.)

मुंबई
- बीड जिल्ह्यांतर्गत येणार्‍या केज विधानसभा अजूनही दिवंगत मंत्री विमल मुंदडा यांचा गड मानला जातो. मुंदडा यांनी येथे जवळपास 15 वर्षांपर्यंत राज्य केले. मूंदड़ा यांचा दबदब्यामुळे हा भाग 'ओनली विमल' यांच्या नावाने प्रसिध्द आहे. मात्र आजारपणामुळे विमल मुंदडा यांचा 2012 ला मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर या जागेसाठी पोट निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच विजय झाला, मात्र तो मुंददा कुटुंबातील सदस्य नव्हता.
आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणूकांमध्ये यावेळेस येथून मुंदडा यांच्याच कुटुंबातील नवीन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उतरला आहे. केज विधानसभा येथील सीटावरून यंदा विमल मुंदडा यांची सुन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महासचिव अक्षय मुंदडा यांची पत्नी नमिता मुंदडा निवडणूक लढणार आहे.

जिंकल्या तर होतील सर्वात तरुण आमदार
जर नमिता केज विधानसभा सिटावरून निवडून आल्या तर त्या राज्यातील सर्वात तरूण महिला आमदार असतील. नमिता यांचे वय केवळ 25 वर्षे आहे. व्यवसायाने आर्कीटेक्ट असलेल्या नमिता यांनी माहेरात कधीच निवडणूक लढवली नाही. त्या त्यांच्या कुटुंबातील निवडणूक लढवणार्‍या पहिल्या महिला उमेदवार आहेत. दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांच्या सून असल्याकारणाने त्यांच्या जनसंपर्क अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, नमिता मुंदडा यांचे निवडक फोटो...