नाशिक - ‘विधानसभेपूर्वीच मोदी हवा नष्ट झाली आहे त्यामुळे राज्यात पुन्हा आघाडीचीच सत्ता येणार आहे. भाजप आणि शविसेनेकडे मुख्यमंत्री पदासाठी एकाही नेत्यामध्ये कुवत नाही. देवेंद्र फडवणीस नाकातल्या नाकात बोलतात तर उद्धव ठाकरे यांना अजून विधानभवनच माहिती नाही. कधी दहा पावले चालला नाही तो काय राज्याच्या समस्या सोडविणार? त्यामुळे उद्घव हे कायम भावी मुख्यमंत्रीच राहतील,’ अशी 'टोलेबाजी नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
शिवसेनेचे रामदास कदम केवळ भुंकणारा कुत्रा आहे, असा आरोप करून राणे म्हणाले की, शिवसेनेचे व्हिजन डाँक्यूमेंट हे केवळ दिखावा आहे. राज्याचे व्हिजनसाठी केवळ घोषणा करुन चालत नाही तर पैसा महत्वाचा आहे. सध्या काँग्रेसकडे पुढील दहा वर्षाच्या योजनांचा आराखडा तयार आहे.’
...तर व्हॅट वाढेल
एलबीटी किंवा जकात यांच्यापैकी एकच बंद करता येईल. जर दोन्ही कर वसुली बंद केल्या तर व्हॅटची टक्केवारी वाढवावी लागेल. त्यामुळे शहराबरो बर ग्रामीण भागातील जनतेला विनाकारण भुर्दंड बसतो. त्यामुळे एलबीटी किंवा जकात यापैकी एक सुरुच ठेवावे लागणार आहे. व्यापारी वर्गाची बैठका झाल्या मात्र त्यावर तडजोड झाली नसल्याचे राणे यांनी नमूद केले.